नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत राज्य प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मणिपूर, त्रिपुरासह जवळपास १४ राज्यांतल्या प्रमुखांनी या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेला. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनातून थेट अमित शाह यांच्या घरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अमित शाह हे लवकरच मुंबईचा दौरा करणार असल्याचंही सांगतिलं जात आहे. उद्धव ठाकरेंचा अमित शाहंवर निशाणा स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेकजण स्वराज्यावर चालून आले होते. त्या कुळातले आताचे शाह, अमित शाह देशाचे गृहमंत्री मुंबईत येवून गेले आणि काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही इथे जमिनीतून ही फक्त गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. हिंमत असेल तर एका महिन्यात मुंबई महापालिका आणि राज्यातल्या निवडणुकाही घेऊन दाखवा. कुस्ती आम्हालासुद्धा येते. आमची तर तीच परंपरा आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







