माणुसकी गेली कुठे? परप्रांतीय मजुरांना पोलिसानं पट्ट्यानं मार मार मारलं

माणुसकी गेली कुठे? परप्रांतीय मजुरांना पोलिसानं पट्ट्यानं मार मार मारलं

अनेक दिवसांपासून अडकलेल्या या मजूरांना आता घरी जाण्याची ओढ लागली आहे.

  • Share this:

बुलडाणा, 9 मे: औरंगाबादमधील करमाडजवळ जालन्याहून मध्य प्रदेशात पायी जाणाऱ्या 16 मजुरांना रेल्वेने चिरडले. ही घटना ताजी असताना बुलडाण्यात परप्रांतीय मजुरांना अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिस कॉन्स्टेबलनं लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्यानं परप्रांतीय मजुरांना अमानुष मारहाण केली. खामगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हेही वाचा..  भीषण अपघात: डॉक्टर पत्नीसह पतीचा मृत्यू, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खामगाव येथील पिंपळगाव राजा मार्गावरील मागासवर्गीय वसतीगृहात 54 परप्रांतीय मजुरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री उशीरा वसतीगृहात काही मजुरांनी गोंधळ केला. ही माहिती शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल बाळू फुंडकर यांना मिळाली. कॉन्स्टेबल बाळू फुंडकर यांनी वसतीगृहात जाऊन मजुरांना पट्ट्याने अमानुष मारहाण केली. यात अनेक मजूर जखमी झाले आहेत.

मजूर घरी जाण्यासाठी गोंधळ करत असल्याचं पोलीस कॉन्स्टेबल बाळू फुंडकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी जिल्हा अधीक्षकांनी दखल घेतली आहे. मजुरांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी फुंडकर यांच्यावर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची तपास करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांचं पथक नेमण्यात आलं आहे.

हेही वाचा...मी खरं प्रेम केलं. . आज तुली सोडून जात आहे! असं लिहून तरुणानं घेतला गळफास

दरम्यान, गेल्या 40 दिवसांपासून पिंपळगाव राजा मार्गावरील मागासवर्गीय वसतीगृहात 54 मजुरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून अडकलेल्या या मजूरांना आता घरी जाण्याची ओढ लागली आहे. त्यांनी प्रशासनाला घरी जाण्यासंदर्भात मागणी देखील केली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या मागणीवर प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याच संदर्भात शुक्रवारी रात्री काही मजुरांनी गोंधळ केला. त्यावरुन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाळू फुंडकर यांनी या सर्व मजुरांना आपल्या पट्ट्याने अमानुषपणे बेदम मारहाण केली, असा आरोप मजुरांनी केला आहे.

First published: May 9, 2020, 5:34 PM IST

ताज्या बातम्या