मी खरं प्रेम केलं. . आज तुली सोडून जात आहे! असं लिहून तरुणानं घेतला गळफास

मी खरं प्रेम केलं. . आज तुली सोडून जात आहे! असं लिहून तरुणानं घेतला गळफास

माझ्या नावावर असलेली एक एकर जमीन बहिणीला द्या. . अर्धा एकर माझ्या मित्राला द्या. .

  • Share this:

बीड, 9 मे: राज्यात कोरोनाचा थैमात सुरु असतान बीड जिल्हा एका घडनेनं हादरला आहे. एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

'मी खरं प्रेम केलं. . आज तुला सोडून जात आहे ' असा मजकूर लिहिलेली सुसाईट नोट आत्महत्या केलेल्या तरुणाच्या शर्टच्या खिशात सापडली आहे. मनीष गणेश घुले (वय- 22, रा. किट्टीआडगाव, ता. माजलगाव ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

हेही वाचा.. धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या, नवव्या मजल्यावरुन घेतली उडी

माजलगाव तालुक्यातील किट्टआडगाव येथे शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मनीष याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनप्रवास संपवला. या घटनेने माजलगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

मी जीवनाला कंटाळलोय...

मनीषने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. ' मी जीवनाला कंटाळलो आहे, माझ्या आईला सांभाळा, माझ्या नावावर असलेली एक एकर जमीन बहिणीला द्या. . अर्धा एकर माझ्या मित्राला द्या. . सावता रासवे मित्रा तू माझ्या आईला सांभाळ. . मी तुझ्यावर खरं प्रेम केलं . . . मी तुला आज सोडून जात आहे . .' असा मजकूर मनीष याने चिठ्ठीत लिहिला आहे.

हेही वाचा.. भीषण अपघात: डॉक्टर पत्नीसह पतीचा मृत्यू, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

मनीष याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली की त्यामागे वेगळंच कारण आहे, याचा तपास माजलगाव पोलिस करत आहेत. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांत नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास बी.ए. पवार करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published: May 9, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या