• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘मी अभिनेता आहे पॉर्नस्टार नाही’; किसिंग सीनमुळे पारसचा वेब सीरिजला नकार

‘मी अभिनेता आहे पॉर्नस्टार नाही’; किसिंग सीनमुळे पारसचा वेब सीरिजला नकार

“असे रोल करायला मी काही पॉर्नस्टार नाही” असं म्हणत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली.

 • Share this:
  मुंबई 11 जुलै: बिग बॉसमधून (Bigg Boss) नावारुपास आलेला पारस छाब्रा (Paras Chhabra) हा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. स्प्लिट्सविलामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या पारसनं अत्यंत कमी कालावधीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज पारसचा वाढदिवस आहे. (Paras Chhabra birthday) 31 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पारसला अत्यंत ग्लॅमरस अभिनेता म्हटलं जातं. परंतु तो आपल्या याच इमेजमुळे सध्या त्रस्त आहे. त्याला सतत किसिंग सीन असलेलेच रोल ऑफर केले जात आहेत. परिणामी “असे रोल करायला मी काही पॉर्नस्टार नाही” असं म्हणत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली. “म्हातारी तुझी आई असेल”; संतापलेल्या कविता कौशिकनं ट्रोलर्सची बोलती केली बंद  टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पारसनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्याने मिळत असलेल्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. “सध्या माझ्याकडे भरपूर काम आहे. मला दररोज विविध OTT प्लॅटफॉर्मवरुन वेब सीरिजच्या ऑफर मिळतायेत. परंतु त्यामध्ये अनेक बोल्ड आणि किसिंग सीन्स असल्यामुळे मी नकार देतोय. जर पटकथेच्या मागणीनुसार एखादी किस करण्यास माझा नकार नाही. पण संपूर्ण सीरिज केवळ इन्टिमेट सीन्सने भरली असेल तर माझ्यासाठी असं काम करणं कठीण आहे. कारण मी आभिनेता आहे. मला अभिनय करायचा आहे. सतत किसिंग सीन करायला मी काही पॉर्नस्टार नाही.” असं म्हणत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली. ‘हा स्प्रे मारला असता आमिरचा घटस्फोट झालाच नसता’; राखी सावंतचा अजब दावा शिवाय पुढे तो म्हणाला, “माझ्या काही मर्यादा आहेत. मी जे काम करतो ते पाहण्यासाठी माझे कुटुंबीय देखील उत्सुक असतात. तुमचं कुटुंब वैचारिक दृष्ट्या कितीही पुढारलेलं असलं तरी आई-बाबांसमोर एखादा किसिंग सीन येताच आपण गोंधळतो. माझीही अशीच अवस्था होते. त्यामुळे यापुढे मी केवळ चांगल्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतोय. रोल अगदी लहान असला तरी चालेल पण त्यामधून माझा अभिनय प्रेक्षकांना दिसावा हीच माझी अपेक्षा आहे.” पारसनं आतापर्यंत ‘स्प्लिट्सविला’, ‘व्ही द सिरिअल’, ‘मुझसे शादी करोगे’, ‘लेडिज वर्सेस जेंटलमॅन’ यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. या ठिकाणी पारसची ग्लॅमरस इमेजच दाखवण्यात आली. परंतु आता त्याला मेथड अॅक्टिंगमध्ये आपलं नशीब आजमावून पाहायचं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: