खड्ड्यात फेकलं नवजात अर्भक! कारण ऐकाल तर सुन्न होईल तुमचं डोकं

खड्ड्यात फेकलं नवजात अर्भक! कारण ऐकाल तर सुन्न होईल तुमचं डोकं

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वसतीगृहाच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात रखरखत्या उन्हात एक नवजात अर्भक सापडलं.

  • Share this:

बीड,11 मे: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ती म्हणजे, येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वसतीगृहाच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात रखरखत्या उन्हात एक नवजात अर्भक सापडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपी माता आणि तिच्या आईला ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा.. मी खरं प्रेम केलं. . आज तुली सोडून जात आहे! असं लिहून तरुणानं घेतला गळफास

समाजात बोभाटा होऊ नये म्हणून निर्दयी मातेने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे निर्दयी माता ही अल्पवयीन असून अविवाहीत आहे. मुल जन्मास आल्यानंतर अवघ्या काही तासांत तिनं पुरूष जातीच्या नवजात अर्भक स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या वसतीगृहाच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात रखरखत्या उन्हात फेकून दिलं होतं. नंतर ही निर्दयी माता पसार झाली होती.

नवजात बाळ सुखरुप असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अहमदनगर जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. शेतात रखरखत्या उन्हात नवजात स्त्री अर्भक सापडलं होतं.

शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथील एका शेतात हे अर्भक सापडलं होतं. सध्या कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी आजूबाजूला तपास केला असता एक लहान मुल कापड्यात लपेटलेलं ऊसाच्या सरीत पडलेलं आढळलं. याबाबत शेत मालकाला माहिती देण्यात आली. शेत मालकाने तात्काळ सरकारी डॉक्टर आणि पोलीस प्रशासनास घटनेबाबत कळवलं.

हेही वाचा.. नाशिकजवळ भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रक आणि कारची धडक, 15 गंभीर

सदर हे अर्भक सरकारी डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, हे कृत्य कोणी केलं याचा पोलीस शोध घेत आहे. तसं पाहिलं तर, 'मुलगी शिकली प्रगती झाली' असे अनेक फलक लावून राज्यात वेगवेगळ्या स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. पण त्यातून लोकांना खरंच शिकवण मिळाली का? हा मात्र प्रश्नच आहे. राज्यात अजूनही महिला अत्याचार कमी झालेले नाहीत. कोणत्याही क्षेत्रात महिला सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

First published: May 11, 2020, 11:47 AM IST
Tags: beed news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading