'पुनश्च: हरिओम'च्या नावाखाली दारूची दुकानं सुरू पण 'हरि' लॉक, भाजप नेते इंदोरीकरांच्या भेटीला

'पुनश्च: हरिओम'च्या नावाखाली दारूची दुकानं सुरू पण 'हरि' लॉक, भाजप नेते इंदोरीकरांच्या भेटीला

वारकरी सांप्रदायाची पताका ज्यांनी घराघरात पोहचवली त्या इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केल्ययानंतर हा विषय संपवायला हवा होता

  • Share this:

शिर्डी, 12 जुलै: मनसेच्या नेत्यांच्या भेटीनंतर रविवारी भाजप नेते इंदोरीकर महाराजांच्या भेटीला आले होते. भाजप आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी इंदोरीकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. वारकरी सांप्रदायाची पताका ज्यांनी घराघरात पोहचवली त्या इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केल्ययानंतर हा विषय संपवायला हवा होता, असं आचार्य तुषार यावेळी म्हणाले.

हेही वाचा..'नया है वह' म्हणत देवेंद्र फडणवीसांनी दिलं आदित्य ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

'पुनश्च: हरिओम'च्या नावाखाली दारुच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू केले. हरिला मात्र लॉक करून ठेवल आहे, अशी आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रानं मंदीरं उघडण्याचे निर्देश दिले. मात्र, महाराष्ट्रात अद्याप कोणतीही प्रकिया सुरू नाही, सर्व नियमावली पाळून मंदिर खुले करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही आचार्य तुषार यांनी केली आहे.

शिवसेना हिंदूत्ववादी होती मात्र या सहा महिन्यात सेनेचा हिंदूत्वाद दिसतो कुठे? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. हल्ली उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कोणाला भेटायला तयार होत नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणी राज्यपालांकडे मांडल्या असल्याचं आचार्य तुषार भोसले यावेळी म्हणाले.

दरम्यान, शनिवारी (11 जुलै) मनसेचे अभिजीत पानसे यांनी इंदोरीकरांची भेट घेतली होती. भाजपचे आचार्य तुषार भोसले इंदोरीकरांच्या भेटीला संगमनेर तालुक्यातील ओझर या गावात दाखल झाले. त्यांनी इंदोरीकर महाराजांशी सुमारे जवळपास तासभर चर्चाही केली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

इंदोरीकरांनी वारकरी संप्रदायाची पताका खेडया पाडयात पोहोचवली आहे. ग्रंथाच्या आधारे महाराजांनी वक्तव्य केलं आहे. .. त्यानंतर माफी मागितल्यावर हा विषय संपायला हवा होता. मात्र काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठीशी असल्याचे यावेळी आचार्य तुषार यांनी सांगितलं.

हेही वाचा..कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी तत्पर असलेल्या प्रसिद्ध डॉक्टरचाच 'कोरोना'नं मृत्यू

कायद्याच्या नावाखाली पुरोगामी मंडळींनी भारतीय संस्कृती तोडण्याचा डाव मांडला आहे. अशा शक्तींना पाठबळ देण्याचं सध्या काम सुरू असल्याची जोरदार टीका आचार्य तुषार यांनी केली. भाजपची भूमिका यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 12, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या