'नया है वह' म्हणत देवेंद्र फडणवीसांनी दिलं आदित्य ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

'नया है वह' म्हणत देवेंद्र फडणवीसांनी दिलं आदित्य ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना ते मंत्री करु शकतात. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै: विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'नया है वह' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्याऐवजी विरोधी पक्षातील नेते मात्र हेल्थ आणि डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी शनिवारी कल्याण येथे केली होती.

हेही वाचा..विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री ज्यांना योग्य वाटतं त्यांना ते मंत्री करु शकतात. पण मंत्री बनवल्याने शहाणपण येतच असं नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना निशाणा साधला आहे.

राज्य सरकारवर गंभीर आरोप..

देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात ज्या दिशेने कोरोनाबाबत आपण जात आहोत, ती परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील 46 टक्के मृतांचा आकडा आपल्या राज्यात आहेत. अनेक मृत्युंची नोंद केली नाही आहे. 600 जणांचा मृत्यू अजूनही अपलोड केलेले नाहीत. लपवालपवी होऊनही येणारे आकडे मोठे आहेत. संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या केल्या जात आहेत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

शरद पवारांची मुलाखत तर 'मॅच फिक्सिंग'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग' असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. कोणीही सरकार पाडत नाही आहे. असं सांगणं म्हणजे कांगावा आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी राऊत यांना लगावला.

हेही वाचा...

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: July 12, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading