जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या मामांचा पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू

राजेंद्र गायकवाड हे शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

शिर्डी, 21 मे: भारतीय संघातील क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे यांचे मामा व संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड यांचे विहिरीत पडल्याने दुर्दैवी निधन झाले. मंगळवारी रात्री उशिरा शोध घेतल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. राजेंद्र गायकवाड यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आश्वी खुर्द येथील प्रसिद्ध डॉ. गणेश गायकवाड यांचे ते बंधु होते. त्यांच्या आकस्मात निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. हेही वाचा… सासूनं गरम चपाती वाढली नाही म्हणून संतापला जावई, उचललं ‘हे’ भयंकर पाऊल मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास राजेंद्र गायकवाड हे शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने कुटुंबातील व्यक्तींनी त्यांची शोधा-शोध सुरु केली. यावेळी शेतातील विहिरीलगत त्यांना संशय आल्याने शोध घेतला असता राजेंद्र गायकवाड यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. यानतंर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर बुधवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हेही वाचा… नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, लवकरच कोरोनावर मात करण्यासाठी होणार यशस्वी दरम्यान राजेंद्र गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे यांचे मामा असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, भावजयी, तीन बहिणी, मेव्हणे व वडील असा मोठा परिवार आहे. पाय घसरून विहिरीत पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्र राधाकृष्ण गायकवाड असं मृत शेतकरी हे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याचे मामा होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात