Home /News /news /

नवी मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी, लवकरच कोरोनावर मात करण्यासाठी होणार यशस्वी

नवी मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी, लवकरच कोरोनावर मात करण्यासाठी होणार यशस्वी

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच सत्तरीपार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता 72 दिवसांचा झाला आहे.

कोरोना संसर्गाची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. पण या सगळ्यात नवी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे.

मुंबई, 21 मे : राज्यात कोरोना (Coronavirus) रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबण्यात येत आहे. असं असतानाही कोरोना संसर्गाची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. पण या सगळ्यात नवी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई शहरातील कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेग आता 6 दिवसांवरून 10 दिवसांवर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं रुग्णांच्या दुपटीचा वेग 10 दिवसांवरून 6 दिवसांवर आला होता. आता मात्र, नवी मुंबईत दररोज कोरोनाचे रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाल्यानं दुपटीचा वेगही 6 वरून 10 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं नागरिकांकडून योग्य पालन आणि चांगल्या आरोग्य सुविधेमुळे हे शक्य झालं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये कोरोनाची साखळी तोडून नवी मुंबईतून कोरोना नष्ट करू असं इथल्या पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. माणुसकीला सलाम! मुंबईत महिला पोलिसाने एकाच दिवशी केले 4 मृतदेहांवर अंत्यसंस्कार सध्या कोरोना रुग्णांचा दुपटीचा वेग 6 वरून 10 दिवसांवर गेला आहे. पण लवकरच हा वेग 20 दिवसांवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचं महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितलं आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. खरंतर राज्यात कोरोनाव्हायरसचा कहर वाढत असला, तरी एक दिलासादायक आकडा बुधवारी समोर आला आहे. आतापर्यंत राज्यातल्या 10,318 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या 24 तासात 679 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात 65 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातले 41 मुंबईतले, नवी मुंबईतले 3, उल्हासनगर 2, पुण्यातले 13, पिंपरी चिंचवड 2, औरंगाबाद - 2, सोलापूर - 2 असे रुग्ण दगावले आहेत. तर बुधवारी राज्यात 2250 रुग्णांचं नव्याने निदान झालं. Lockdown चा फायदा, काही तासांसाठी उघडलं सलून अन् लखपती झाली हेअर स्टायलिस्ट आतापर्यंत महाराष्ट्रात 39,297 कोरोनारुग्ण सापडले आहेत. हा आकडा मोठा असला, तरी त्यातले बरे होणारे रुग्णही वाढत आहेत. आतापर्यंत 1390 रुग्णांचं Covid-19 मुळे निधन झालं आहे. आतापर्य़ंत 3 लाख 7 हजार 72 जणांची COVID-19 चाचणी करण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या