महाराष्ट्रातल्या तरुणांचं 'जय जवान',  तीन वर्षात 11 हजार तरुण लष्कारत दाखल

महाराष्ट्रातल्या तरुणांचं 'जय जवान',  तीन वर्षात 11 हजार तरुण लष्कारत दाखल

महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्ये यात वरच्या क्रमांकावर असून या जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक गावचे तरुण हे सैन्यात भरती आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 12 मार्च : सैन्यात करियर करणं याची तरुणांमध्ये क्रेझ असते. तरुणांचा एक मोठा वर्ग सैन्यात जाण्याची इच्छा बाळगतो. सैन्यात दाखल होणाऱ्या तरुणांमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांचा अव्वल क्रमांक लागतो. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हेही पुण्याचे आहेत. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रातल्या तरुणांची माहिती बाहेर आली असून गेल्या  तीन वर्षांमध्ये तब्बल 11 हजार तरुण लष्करात दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिलीय.

गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे. देशातील तरूण मोठया प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये 30 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांतील तसेच नेपाळमधील  सरासरी 95 टक्के  तरूण दाखल झाले आहेत. यात एकटया महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा समावेश आहे.

वर्ष 2016-17 मध्ये महाराष्ट्रातील 3 हजार 980 तरूण , वर्ष 2017-18 मध्ये  3 हजार 836 आणि वर्ष 2018-19 मध्ये 4 हजार 50 तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत. भारतीय सैन्यात वर्ष 2016-17 मध्ये 52 हजार 86 तरूण दाखल झाले, वर्ष 2017-18 मध्ये 49 हजार 438 तर वर्ष 2018-19 मध्ये 53 हजार 378 दाखल झाले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

'दैव देतं आणि कर्म नेतं', शिंदेंच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्ये यात वरच्या क्रमांकावर असून या जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक गावचे तरुण हे सैन्यात भरती आहेत. काही गावांमध्ये तर घरटी प्रत्येक तरुण हा सैन्यात गेलेला आहे. त्यामुळे अशा गावांना सैन्याचं गाव असंही म्हटलं जातं. तर अनेक घरांमध्ये तीन ते चार पिढ्या या सैन्यात दाखल झालेल्या आहेत.

हेही वाचा...

पुण्यातील धक्कादायक प्रकार, नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी तरुण झाला चोर

व्यापाऱ्याला 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीला अखेर अटक

First published: March 12, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading