गणेश गायकवाड, प्रतिनिधी
उल्हासनगर, 12 मार्च : व्यापाराला १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या कुख्यात गुंड दीपक सोंडेला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यापासून सोंडे फरार होता. विशेष म्हणजे कुख्यात गुंड दीपक सोंडे हा भाजप नगरसेविकेचा पती असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दिलीप सोंडे याने उल्हासनगर मधील व्यापारी नरेश रोहरा यांना 4 जानेवारीला 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी कुख्यात गुंड दीपक सोंडेसह त्याच्या चार अज्ञात साथीदारांविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली होता.
उल्हासनगरात कुख्यात गुंड दीपक सोंडे नामचीन गुंड आहे. त्याचावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तीन ते चार पथके तयार करून त्याचा शोध घेत होते. अखेर बुधवारी हिललाईन पोलिसांनी त्याला गजाआड करीत न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मनसेच्या संपर्क अध्यक्षावर हल्ला
दरम्यान, मनसेच्या करमाळा संपर्क अध्यक्षावर हल्ला करण्यात आलाय. बदलापुरात मंगळवारी रात्री हा हल्ला करण्यात आला.
बदलापूर पूर्वेच्या लंबोदर पॅलेस ,मुजुमदार रोड भागातील डॉ. कलाम उद्यानात धुळवडीनंतर ४ ते ५ जण दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी मनसेचे करमाळा संपर्क अध्यक्ष राम जगताप आणि त्याच्या मित्रांनी उद्यानातून जाण्यास सांगितलं. मात्र, याचा राग आल्याने ऋषी शास्त्री आणि त्याच्या 4 ते 5 साथीदारांनी उद्यानातील दगड आणि विटांनी जगताप आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला.
यात जगताप जखमी झाले असून त्याच्यावर बदलापूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.