मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यातील धक्कादायक प्रकार, नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी तरुण झाला चोर

पुण्यातील धक्कादायक प्रकार, नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी तरुण झाला चोर

तरुण नोकरी करीत होता, मात्र अचानक नोकरी गेल्याने त्याने हे भयावह पाऊल उचलले

तरुण नोकरी करीत होता, मात्र अचानक नोकरी गेल्याने त्याने हे भयावह पाऊल उचलले

तरुण नोकरी करीत होता, मात्र अचानक नोकरी गेल्याने त्याने हे भयावह पाऊल उचलले

पुणे, 12 मार्च : देशातील बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे. अशावेळी लोक कोणतंही पाऊल उचलू शकतात. याचा प्रत्यय पुण्यातील एका चोरीच्या प्रकरणातून आला आहे. नोकरी असताना घरात सर्व व्यवस्थित सुरू होतं. मात्र नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी त्यानं चोरीचा पर्याय स्वीकारला.

येरवडा, नागपूर चाळ येथे राहणारा हुसेन शेख असं संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव पार्क या भागात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यासाठी गुन्हे शाखेच्या युनिटच्या पथकाने याचा तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हुसेन शेख याच्याबाबत माहिती मिळाली.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी हुसेन शेखचे घर गाठले. त्याची बायको औरंगाबाद येथे राहते. तो कधी तिच्याकडे तर नगर येथील त्याच्या मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस नाईक स्वप्निल कांबळे यांना हुसेन चोरी करणार असल्याची टीप मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने आरोपीला दोन मोबाइलसह ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी सांगितल्यानुसार, अचानक नोकरी गेल्यामुळे हुसेनला घराचा चालवणे अवघड जात होते. त्यामुळे उपजीविका भागवण्यासाठी हुसेनने मोबाइल चोरण्याचा पर्याय स्वीकारला. त्याने आतापर्य़ंत अनेक मोबाइल चोरले असून अनेक मोबाइल त्याने आपल्या बायकोकडे ठेवले आहेत. पोलिसांनी त्याला दोन मोबाइलसह पकडले.

हे वाचा - 'तुझ्या बायकोचे...'कैद्यांनी चिडवलं, जामीन घेऊन पत्नीचा जीव जाईपर्यंत डोकं फोडलं

First published:

Tags: #Pune, Mobile, Theif