Home /News /astrology /

Daily Horoscope : या राशीला उद्या अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा 12 राशींचं भविष्य

Daily Horoscope : या राशीला उद्या अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा 12 राशींचं भविष्य

दिनांक २४ एप्रिल २०२२ वार रविवार. चैत्र कृष्ण नवमी. चंद्र सायंकाळ पर्यंत मकर राशीत असून त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य .

दिनांक २४ एप्रिल २०२२ वार रविवार. चैत्र कृष्ण नवमी. चंद्र सायंकाळ पर्यंत मकर राशीत असून त्यानंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य . मेष आज दिवस तुम्हाला भाग्य दायक आहे. चंद्र मन आनंदीत ठेवेल. लाभ स्थानातील शुक्र स्त्री वर्गाकडून अकल्पित लाभ प्राप्त करून देईल. दिवस शुभ. वृषभ आज आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे. अनपेक्षित खर्च झाले तरी आनंद मिळेल नाव लौकिक वाढेल. दिवस शुभ फल देईल. मिथुन अचानक प्रवास योग. भाग्यातील शुक्राचा आनंद दायक प्रवेश तुम्हाला नवीन शुभ घटनांची चाहूल देईल. प्रकृती सांभाळा. दिवस मजेत जाईल. कर्क राशीच्या सप्तम, अष्टम स्थानातील चंद्र अचानक उलाढाल घडवेल. दिवस सुट्टीचा आहे तरी तुम्हाला काही नवीन जबाबदारी येईल. घरात देखील काम राहील. दिवस मध्यम जाईल. सिंह आज दिवस भाग्य दायक असून अध्यात्मिक अनुभव देईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गाठीभेटी होतील. दिवस सौख्याचा जाईल. कन्या आज दिवस गडबडीचा व कष्टाचा आहे. अंगावर घेतलेली जबाबदारी जास्त ताण देईल. मात्र विचलित होऊ नका. दिवस शांतपणे घालवा. तुला आज जोडीने आनंदात गृह सौख्य अनुभव कराल. हर्ष आणि उल्हास याने मन भरून जाईल. नातेवाईक भेटतील. दिवस शुभ. वृश्चिक आज दिवस कोणाशीही वाद विवाद न करता घालवा. शत्रू निर्माण होतील. मात्र नवीन वर्षात दिवस ईश्वराची सेवा करण्यात घालवा. आर्थिक बाजू जपा. धनु राशीच्या द्वितीय स्थानातील चंद्र सामाजिक जीवनात प्रतिष्ठा व आनंद मिळवून देईल. आर्थिक लाभ होतील मुला सोबत दिवस सुखात जाईल. मकर तुमच्या राशीतील शनि अजूनही ताण देत आहे. तरी आज गृहसौख्य मिळेल. आनंदात रविवार साजरा करताना त्रास विसरून जाल. दिवस शुभ आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आर्थिक हानी पासून जपावे. मात्र अचानक होणारा धनलाभ आनंद देईल. नवीन वस्त्र, दागिना खरेदी कराल. दिवस उत्तम. मीन आज उच्च प्रतीचा लाभ मिळणार असून आर्थिक बाजु समृद्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस अतिशय गडबडीत जाईल. शुभम भवतू !!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या