मुंबई, 23 एप्रिल- अभिनेता सुबोध भावे (subodh bhave ) सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. सुबोध भावे नेहमीच विविध विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तो माहिती शेअर करत असतो. सुबोध भावेने नुकताच त्याच्या एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्याचा हा फोटो पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की, त्याने अभिनय सोडला की काय? शिवाय सुबोधची फोटो कॅप्शन देखील सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. सुबोध भावेने मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या ऑफिसमधील एक फोटो त्याच्या इन्स्टाला पोस्ट केला आहे. सुबोध भावेने मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लोगो आणि नाव असलेल्या भिंतसमोर उभा राहून एक फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोहून अधिक चर्चा या फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शनची आहे. सुबोधने हा फोटो शेअर करताना, जस्ट जॉइण्ड… मायक्रोसॉफ्ट…आमच्याकडे विंडोज बसवून मिळतील, अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. सुबोध भावेच्या या भन्नाट कॅप्शनवर चाहत्यांनीही भन्नाट कमेंट केल्या आहेत. वाचा- ‘तुझेच मी गीत गात आहे’ मध्ये दिसणार ‘ही’ स्टार किड्स, साकरणार महत्त्वाची भूमिका एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे की, सर तुमची ओळख असेल तर रिझुम पाठवू का….तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, तुमच्या खिडक्यांचे काम कधी पूर्ण होणार? भारतातली तिकीट खिडकी तुमची आतुरतेने वाट बघत आहे!! 😁😁😁👏🏻 तर आणखी एकानं म्हटलं आहे की, Hahahahaha😂😂 “आमचे येथे Apple खात खात Windows बसवून मिळतील”…….असचं आणखी एकानं म्हटलं आहे की, हा हा भारीच..😂😂 पण नको..विंडोज बसवणारे खूप जण मिळतील..तुमच्यासारखे अभिनय सम्राट फक्त तुम्हीच..😍😍😍❤️❤️❤️यासोबतच एकानं म्हटलं आहे की, पुढील चित्रपटात सुबोध भावे साकारणार बिल गेट्स.😂
सुबोध भावे सध्या त्याचे लोकप्रिय नाटक अश्रुंची झाली फुलेच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर आहे. त्याच्यासोबत संपूर्ण टीम तिथे आहे. नुकतेच अटलांटामध्ये त्यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा प्रयोग पार पडला.