जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरे बापरे! मैदानातून धावत येत बैलाने प्रेक्षकांवरच घेतली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

अरे बापरे! मैदानातून धावत येत बैलाने प्रेक्षकांवरच घेतली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

फोटो सौजन्य - युट्युब व्हिडीओ ग्रॅब (Hugo Happenings)

फोटो सौजन्य - युट्युब व्हिडीओ ग्रॅब (Hugo Happenings)

बैलाचा हा हल्ला (Bull attack) पाहून धडकीच भरते.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 08 ऑगस्ट : म्हैस, बैल, रेडा (Bull) हे पाळीव प्राणी असले तरी ते चवताळले (Angry Bull) तर त्यांच्यासमोर कुणाचाच टिकाव (Angry Bull attack) लागू शकत नाही. त्यामुळे अशा प्राण्यांशी खेळ म्हणजे जीव धोक्यात घालणंच आहे. अशाच एका संतप्त बैलाचा व्हिडीओ (Bull video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात बैलाने मैदानातून थेट प्रेक्षकांवरच उडी मारली आहे. अमेरिकेच्या इडाहोमध्ये बैलांची स्पर्धा होती. त्यामुळे एक बैल मैदानातून थेट प्रेक्षकांकडे धावत गेला आणि प्रेक्षकांमध्ये त्याने उडी मारली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकीच भरेल.

Hugo Happenings युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बैल मैदानात आहे. स्पर्धदरम्यान तो खवळला आहे. इथून तिथून पळतो आहे. प्रेक्षकांवर झडप घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याला प्रेक्षकांसमोर बांधण्याच आलेल्या रिंगमुळे त्याला ते शक्य होत नाही. तरी तो प्रयत्न करतो. अखेर तो धावत प्रेक्षकांच्या दिशेने येतो आणि रिंग तोडून थेट प्रेक्षकांवर उडी मारतो. हे वाचा -  VIDEO : गजराजाला आला राग; हत्तीने शेपटी धरून मगरीला पाण्यातच आपट आपट आपटलं बैलाने उडी मारताच प्रेक्षक घाबरता. आपला जीव वाचवण्यासाछी तिथून पळू लागता. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झालेली नाही, अशी माहिती मिळते आहे. यानंतर या बैलाला नियंत्रणात आणण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात