ठाणे, 08 ऑगस्ट: ठाण्यातील (Thane) कळवा (Kalwa East) येथे दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली आहे. कळवा पूर्व येथील इंदिरानगरमधील माँ काली चाळीतील सहा घरांवर ही दरड कोसळली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या दुर्घटनेत सहा घरांचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
As a precautionary measure, residents of nearby houses shifted to TMC School of Gholai Nagar with the help of the RDMC team & fire brigade team: Regional Disaster Management Cell of the Thane Municipal Corporation
— ANI (@ANI) August 7, 2021
कळवा पूर्व भागातील इंदिरानगरमधील माँ काली चाळ येथील घरांवर दरड कोसळली. यात सहा घरांचे नुकसान झालं आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून जवळच्या घरांतील रहिवाशांना पत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 घरातील कुटुंबियांना गोलाई नगर येथील ठाणे महापालिका शाळेत हलवलं आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane