नांदेड, 06 मार्च : ‘सरकारच गुणगान केलं तर बरं आहे अन्यथा विरोधात बोललं तर काही खरं नाही अशी परिस्थिती आहे. आणीबाणीत जे घडलं नाही अश्या घटना घडतात. सरकार विरोधात बोललं तर लोकांना जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत ही शोकांतिका आहे’ अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. नांदेडमध्ये संगीत शंकर दरबार सोहळा पार पडला. यावेळी अशोक चव्हाण हे उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ‘आजची परिस्थिती पाहिली तर सर्वच वातावरण बदलत चाललं आहे. मोकळेपणाने बोलू शकतात का, सरकारचं गुणगान केलं तर सगळं चांगलं आहे. सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल. पण जर विरोधात बोललं तर मग काही खरं नाही. एवढंच नाहीतर, सरकारच्या विरोधात बोलला तर आणीबाणीमध्ये असं काही घडलं नाही, तिथे लोकांना जीवे मारण्यापर्यंत घटना घडतात, ही देशाची शोकांतिका आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. (‘शरद पवार-गो बॅक’ अहमदनगरमध्ये कुणी केली घोषणा, काय आहे प्रकरण?) ‘लेखकांना गोळ्या घालण्यापर्यंत हे प्रकार घडले आहे. नरेंद्र दाभोळकर, काँग्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील ही सगळी उदाहरण आपल्याकडे आहे. त्यांनी कधी प्राणाची पर्वा केली नाही. पण, त्यांना प्राण गमवावा लागला अजूनही तपास सुरू आहे, हाती काहीच लागले नाही’ अशी नाराजीही चव्हाण यांनी व्यक्त केली. (रवींद्र धंगेकरांच्या विजयावरून शरद पवारांनी उडवली फडणवीसांची खिल्ली, म्हणाले…) ‘मला खात्री आहे, आमचे साहित्यिक, कवी, पत्रकार असतील तर ते निर्भिडपणे बाजू मांडतील. अनेक गोष्टी आपण पाहतो जे घडत आहे, मनाला पटत नाही. हा देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची चर्चा होत आहे. राजकीय स्वार्थासाठी सामाजिक वातावरण खराब केले जात आहे. देशविरोधी धोरण स्विकारले जात आहे, आपण काही बोललो तर आपल्याला देशद्रोही ठरवलं जात आहे, अशी परिस्थिती आपण पाहत आहोत’ अशी टीकाही अशोक चव्हाण यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.