जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तुमच्यासारखं आत्मक्लेश करायला गेलो नाही', मुख्यमंत्री शिंदेंचा अजितदादांना टोला

'तुमच्यासारखं आत्मक्लेश करायला गेलो नाही', मुख्यमंत्री शिंदेंचा अजितदादांना टोला

'मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तीच टीका करत आहात'

'मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तीच टीका करत आहात'

‘मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तीच टीका करत आहात’

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च :  ‘मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तेच म्हणत आहे, लोकसेवा आयोग किंवा निवडणूक आयोगच तेच लावलं आहे. पण आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्त्व आहे. मी श्रेय घेत नाही, पण तुमच्यासारखं वसंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आत्मक्लेश करायला जावं लागलं नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना लगावला. विधान सभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. अगोदर एमपीएमसीचा निर्णय झाला होती, मी त्यावेळी त्या सरकारमध्ये होतो. पण त्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायची. मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तेच म्हणत आहे, लोकसेवा आयोग किंवा निवडणूक आयोगच तेच लावलं आहे. पण आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्त्व आहे. मी श्रेय घेत नाही, मी माझ्या पद्धतीने काम करतो. तिथले सगळे अधिकारी तुमच्या ओळखीचे आहे. मी त्यावर खुलासा केला, पण तुमच्यासारखं वसंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आत्मक्लेश करायला जावं लागलं नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना लगावला. (संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करा, मनसे नेत्याची खळबजनक मागणी) ‘तुम्ही जेव्हा शपथ घेतली होती, ठाण्यात तुमचा पुतळा जाळला होता. त्या सगळ्या घोषणा आमच्याकडे आहे. त्यावेळी 10 वेळा लोकांना फोन करावे लागले होते, त्यावेळी आम्ही बाहेर आलो होतो. आम्ही खरी शिवसेना आहोत, त्यामुळे लोक आमच्याकडे येत आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. ‘सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही. दिसत असलं तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं विरोधकांचं काम आहे, तुमचं मोती बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल’, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ‘अडीच वर्षांमध्ये सगळे प्रकल्प थांबले होते. तुम्ही सुद्धा होता तिथे, पुढील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहे. महाराष्ट्रापुढे नवीन चित्र निर्माण करणार आहे. या राज्यातील इन्फ्रा प्रकल्प सादर करणार आहोत’, असंही शिंदे म्हणाले. (Pune Bypoll election Results : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या वाटेत ‘काटे’, पण उद्धव ठाकरेंनी सांगितलं वेगळंच गणित) ‘दावोसमध्ये मागच्या वेळी 50 हजार कोटींचे करार झाले होते. त्या कंपनीचे नाव घेत नाही, पण एकाही कंपनीची गुंतवणूक झाली नाही. दिल्लीची कंपनी होती. सामजस्य करार होते, आपल्याकडे गुंतवणूक मोठी येईल, असंही शिंदे म्हणाले. दावोसमध्ये ४२ कोटी रुपये खर्च झाले बोलतात पण प्रत्यक्षात ३५ कोटी रुपये खर्च झाले आहे. महाराष्ट्र पॅव्हिलियेन सर्वात चांगले होते. मागच्या वर्षा मध्य प्रदेश पॅव्हिलियेनमधून खूर्चा आणि टेबल आणावे लागले होते. आमच्याकडे जागा आहे, इंडस्ट्रीसाठी जागा आहे, सोईसुविधा आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर आपल्याकडे गुंतवणूक सुरू झाली आहे. आता आपल्याकडे रोजगार निर्माण झाले आहे, असं आश्वासनही शिंदेंनी दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात