जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीनं दिला नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं!

रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीनं दिला नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं!

रोज-रोज सेक्स करण्यासाठी पत्नीनं दिला नकार; भडकलेल्या पतीच्या कृत्याने यवतमाळ हादरलं!

यवतमाळमधील एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife brutal murder in yavatmal) केली आहे. हत्येचं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 10 ऑक्टोबर: यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पगंडी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife brutal murder in yavatmal) केली आहे. शारीरिक संबंध ठेवण्यावरून झालेल्या वादानंतर (Hassle over sexual relation) तरुणानं आपल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण ऐकूण पोलीस देखील चक्रावले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Accused husband arrest) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संतोष गुरुदेव ठाकरे असं अटक केलेल्या पतीचं नाव असून तो घाटंजी तालुक्यातील पगंडी येथील रहिवासी आहेत. तर दिशा ठाकरे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. आरोपी संतोष आणि मृत दिशा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर, शारीरिक संबंध ठेवण्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होतं होता. आरोपी पती मृत महिलेवर दररोज शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. हेही वाचा- बिझनेस मिटींगसाठी बोलवून तरुणीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना दरम्यान आज सकाळी अंदाजे 6 च्या सुमारास देखील शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांत पुन्हा वाद झाला होता. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपी पती संतोषला राग अनावर झाला. त्यानंतर त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं गंभीर वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता, की यामध्ये पत्नी दिशा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यानंतर अवघ्या काही क्षणातच पत्नी दिशानं जागीच प्राण सोडला आहे. हत्येची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. हेही वाचा- सांगली: 5 वर्षांपूर्वी दोस्तीत आलं वैर; डोक्यात दगडी पाटा घालूनच मैत्रीचा शेवट या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात