मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सांगली हादरली! 5 वर्षांपूर्वी दोस्तीत आलं वैर; डोक्यात दगडी पाटा घालूनच मैत्रीचा शेवट

सांगली हादरली! 5 वर्षांपूर्वी दोस्तीत आलं वैर; डोक्यात दगडी पाटा घालूनच मैत्रीचा शेवट

विक्रम रमेश वाघमारे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

विक्रम रमेश वाघमारे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव आहे. (फोटो-लोकमत)

सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील हरिपूर येथे एका तरुणाचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या (Brutal murder in sangli) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सांगली, 10 ऑक्टोबर: सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील हरिपूर येथे एका तरुणाचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या (Brutal murder in sangli) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुण मारहाणीबाबतचा खटला मागे घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेला होता. दरम्यान झालेल्या वादावादीनंतर फिर्यादी तरुणानं डोक्यात दगडी पाटा घालून तरुणाची हत्या (Crashed head with stone) केली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी तरुणासह त्याच्या आई आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटेनाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विक्रम रमेश वाघमारे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय युवकाचं नाव असून तो हरिपूर येथील कुबाडगे गल्लीतील रहिवासी आहे. तर राहुल आप्पासाहेब पिंगळे (वय-30), आप्पासाहेब दिनकर पिंगळे (वय-53) आणि आई लता आप्पासाहेब पिंगळे (वय-50) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. संबंधित सर्व आरोपी हरिपूर येथील पिंगळे मैदान परिसरातील रहिवासी आहे.

हेही वाचा- VIDEO: जिलेटीनच्या कांड्यांनी घडवला स्फोट; नगरमध्ये एटीएम फोडून लाखो रुपये लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विक्रम आणि आरोपी राहुल हे एकमेकांचे चांगले दोस्त होते. दरम्यान 2016 किरकोळ कारणावरून दोघांत वाद झाला होता. त्यानंतर विक्रमने रागाच्या भरात राहुलला मारहाण केली होती. मारहाण झाल्यानंतर राहुलनं विक्रम विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होते. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेलं असून त्यावर सुनावणी सुरू आहेत. दरम्यान हा खटला मागे घ्यावा यासाठी विक्रम प्रयत्न करत होता.

हेही वाचा-पुण्यात मध्यरात्री खूनी थरार; बस थांब्यावरील तरुणाची डोक्यात फरशी घालून हत्या

यासाठी शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास विक्रम राहुलच्या घरी गेला होता. संबंधित खटला मागे घ्यावा, दोघांतील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, असा हेतू विक्रमचा होता. पण याठिकाणी चर्चा करत असताना, विक्रम आणि राहुल यांच्यात पुन्हा वाद झाला. यामुळे राहुलने पाच वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला, विक्रमची हत्या करून घेतला आहे. राहुलने घराच्या बाजूला पडलेला दगडी पाटा डोक्यात घालून विक्रमची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Sangli