पोटावर वार करून 21 वर्षीय पत्नीचा खून, 5 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

पोटावर वार करून 21 वर्षीय पत्नीचा खून, 5 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

कुंभार गल्ली येथील 21 वर्षीय विवाहितेचा पतीने धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 10 जुलै : पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथील 21 वर्षीय विवाहितेचा पतीने धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. आज शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे.

पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली भागात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास निकिता आकाश पवार या विवाहितेचा पतीने पोटावर धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार घटनास्थळी पोहोचले आहेत.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करून पती स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला. निकिता आकाश पवार (वय 21 ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - धक्कादायक! परळीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन पुण्यात बलात्कार

याबाबत पंढरपूर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, कुंभार गल्ली येथील रहिवाशी आकाश पवार (वय 23) याचे पाच महिने पूर्वी निकिता बरोबर लग्न झाले होते. आकाश याने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री निकिताचा खून करून स्वतः हून सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.

दरम्यान, पतीने पत्नीचा खून केल्यामुळे कुंभार गल्ली परिसरात खळबळ उडाली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 10, 2020, 10:59 AM IST

ताज्या बातम्या