• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • धक्कादायक! परळीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन पुण्यात बलात्कार

धक्कादायक! परळीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन पुण्यात बलात्कार

अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:
बीड, 9 जुलै: अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी परळी शहरात रहिवासी आहे. पीडित मुलगी 16 वर्षांची असून नराधमानं तिला परळी येथून पळवून नेलं. परभणी आणि पुणे शहरातील वेगवेगल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नासिर पाशा पठाण याच्यासह त्याची पत्नी आरशा नासिर पठाण हिला महिलेला ताब्यात घेतलं आहे.  या प्रकरणी परळी शहरातील संभाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हेही वाचा...परिस्थिती बघून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला संवाद काय आहे प्रकरण? आरोपी नासिर पाशा पठाण यानं पीडित मुलाला तिच्या राहत्या घरातून लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं होतं. नंतर तिला परभणी, पुणे येथे नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडितेच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पीडित मुलगी परभणीत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. पोलिसांनी तिथं जाऊन चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेने पोलिसांजवळ आपबिती कथन केली. नंतर पोलिसांना नासिर आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. हेही वाचा...फोटो लेते रहो...अमृता फडणवीस यांची सोशल मीडियावर पुन्हा एकदा उडवली खिल्ली! आरोपी नासिर आणि आरशा या दोघांनी संगनमतान पीडितेचं परळीहून अपहरण केलं. नंतर आरोपी पीडितेवर वारंवार बलात्कार करत होता. दोन्ही आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चांद मेंडके करत आहेत
Published by:Sandip Parolekar
First published: