जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई: संतापलेल्या कामगारानं घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं अन्...

मुंबई: संतापलेल्या कामगारानं घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं अन्...

मुंबई: संतापलेल्या कामगारानं घेतला विचित्र बदला; मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं अन्...

मुंबईच्या नेहरू नगर पोलीस ठाण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका कामगाराने आपल्या मालकासोबत वाद झाल्यानंतर, थेट मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण (4 years old minor boy kidnap) केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 नोव्हेंबर: मुंबईच्या नेहरू नगर पोलीस ठाण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका कामगाराने आपल्या मालकासोबत वाद झाल्यानंतर, थेट मालकाच्या 4 वर्षीय मुलाचं अपहरण (4 years old minor boy kidnap) केलं आहे. आरोपीनं मुलाचं गुपचूप अपहरण करून त्याला नाशिक येथे आणलं होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला जेरबंद (Accused arrested) केलं आहे. तसेच 4 वर्षीय मुलाची सुटका करून त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केलं आहे. अपहरण झालेला चिमुकला 12 तासांनी सुखरूप घरी पोहोचल्यामुळे आई वडिलांच्या जीवात जीव आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत. अजय तिवारी असं अटक केलेल्या आरोपी कामगाराचं नाव आहे. तर महेंद्र बालोडीया असं फिर्यादीचं नाव असून तो ठक्कर बाप्पा कॉलनीतील रहिवासी आहेत. फिर्यादी महेंद्र यांचा चपलीचा व्यवसाय आहे. त्याच्या दुकानात चप्पल बनवण्यासाठी चार-ते पाच कामगार काम करतात. आरोपी अजय तिवारी देखील त्यांच्या दुकानात चप्पल तयार करण्याचं काम करतो. चार दिवसांपूर्वी आरोपी कामगार अजय तिवारी आणि मालक महेंद्र बालोडीया यांच्यात वाद झाला होता. हेही वाचा- पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला अटक आरोपी अजय तिवारी दारू पिऊन कामावर आल्याने मालक महेंद्र बालोडीया यांनी त्याला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे अजयचा महेंद्र यांच्यावर राग होता. याच रागातून मालकाला धडा शिकवण्यासाठी आरोपीनं महेंद्र यांच्या चार वर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला. त्यानुसार त्याने 4 वर्षीय मुलाचं अपहरण केलं. पण ओळखीच्या काहीजणांनी अजय मुलाला घेऊन जात असल्याचं पाहिलं होतं. फिर्यादी महेंद्र यांनी आसपासाच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, अजय मुलाला घेऊन जाताना दिसला. हेही वाचा- दरोडा टाकलेल्या घरात सोडला भलताच पुरावा; जबरी गुन्ह्यातील भामटा झाला गजाआड मुलाचं अपहरण झाल्याचं कळताच महेंद्र बालोडीयांनी तातडीने मुंबईतील नेहरू नगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे आरोपीच्या शोध घेतला आहे. नाशिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 4 वर्षीय चिमुकल्याची सुटका केली आहे. या घटनेचा पुढील तपास नेहरू नगर पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात