मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सातारा हादरलं! आधी झोपेतून उठवलं मग...; सख्खा भावाला मध्यरात्री दिला भयंकर मृत्यू

सातारा हादरलं! आधी झोपेतून उठवलं मग...; सख्खा भावाला मध्यरात्री दिला भयंकर मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Satara: सातारा जिल्ह्याच्या म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वयोवृद्धाची काठीने आणि धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या (attack with stick and sharp weapon) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

सातारा, 10  नोव्हेंबर: सातारा जिल्ह्याच्या म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वयोवृद्धाची काठीने आणि धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या (attack with stick and sharp weapon) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेतीच्या पाण्यावरून वाद झाल्यानंतर (Dispute over water), सख्ख्या भावानेच आपल्या मुलाच्या मदतीने भयंकर मृत्यू दिला आहे. संबंधित घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने आपल्या चुलत्यासह त्याच्या मुलावर खुनाचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं (accused taken into custody) आहे. या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

आण्णा धुळा वाघमोडे असं हत्या झालेल्या 75 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते वरकुटे मलवडी येथील रहिवासी आहे. मृत आण्णा वाघमोडे सोमवारी रात्री आपल्या शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्री 2 वाजता वीज येणार असल्याने ते ज्वारीच्या शेतातच झोपले होते. यावेळी आरोपी मारुती धुळा वाघमोडे आणि पुतण्या आबा मारुती वाघमोडे याठिकाणी आले. त्यांनी मृत आण्णा यांना झोपेतून उठवलं. आणि आम्हाला शेतातून पाणी नेऊ दे, अशी परवानगी मागितली.

हेही वाचा-पुणे: पती रुग्णालयात असल्याचं कळताच साधला डाव; विवाहितेला गोठ्यात डांबून गॅंगरेप

पण मृत आण्णा यांनी शेतातून पाणी घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांनी नकार दिल्याने संतापलेल्या दोघांनी संगनमताने कुऱ्हाड, दगड आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केलं. या मारहाणी 75 वर्षीय आण्णा वाघमोडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मृताचा मुलगा सदाशिव अण्णा वाघमोडे याने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा-जमीन हडपण्यासाठी सुनेनं केला सासूचा खून, हतबल पतीच्या डोळ्यांदेखल केले वार

पोलिसांनी मारुती धुळा वाघमोडे आणि त्यांचा मुलगा आबा मारुती वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. शेतीच्या पाण्यासाठी सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पुढील तपास म्हसवड पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Brother murder, Crime news, Satara