हल्लेखोरांनी कापला पोलिसाचा हात, डॉक्टरांनी साडेसात तास शस्त्रक्रिया करून जोडला

हल्लेखोरांनी कापला पोलिसाचा हात, डॉक्टरांनी साडेसात तास शस्त्रक्रिया करून जोडला

निहंग्यांच्या एका गटाने तलवारीने केलेल्या हल्ल्यात कापलेला हात घेऊन दुचाकीवरून पोलीस रुग्णालयात पोहोचला होता.

  • Share this:

चंदीगढ, 12 एप्रिल : पंजाबमधील पटियाला जिल्ह्यात रविवारी निहंग्यांच्या एका गटाने पोलीस अधिकाऱ्यावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली होती. यामध्ये एएसआय हरजीत सिंग यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. त्यानंतर गंभीर अवस्थेत हरजीत सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर जवळपास साडेसात तास शस्त्रक्रिया करून हात जोडण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं की, हरजीत सिंग यांचा हात जोडण्यासाठी पीजीआयमध्ये साडेसात तास ऑपरेशन झालं.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी सर्व डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या अवघड शस्त्रक्रियेसाठी आभार मानतो. तसंच एएसआय हरजीत सिंग लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो.' पंजाबच्या पटियालातील भाजी मार्केट सनौर रोडवर रविवारी सकाळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 7 जणांना ताब्यात घेतलं होतं. या सातपैकी 5 लोक असे आहेत जे पाटियालातील भाजी मार्केटच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते.

पोलिसांवर झालेल्या या हल्ल्याची मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी निंदा केली. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी राज्यात 23 मार्चपासून कर्फ्यू लागू केला आहे. त्याचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे. हल्ला करणाऱ्यांकडे पेट्रोल बॉम्ब आणि धारधार शस्त्रे सापडली आहेत.

हे वाचा : कोरोनाचा कहर असताना दिल्लीत भूकंपाचे धक्के, 'देवा काय आहे मनात?'

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या पथकावर हल्ला करणारे लोक जवळच्याच गुरुद्वारात लपले होते. त्ायमुळे पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला पाठवण्यात आलं होतं. हल्लेखोरांना पकडण्यासाठी गुरुद्वारात प्रवेश करताना पोलिसांनी शिखांच्या सर्व नियमांचं पालन केलं. यामध्ये तीन हल्लेखोरांसह 7 जणांना पकडलं.

हे वाचा : ‘COVID19विरुद्ध भारत मारणार का बाजी? सुरू आहे 40 पेक्षां जास्त लसींवर संशोधन

First published: April 12, 2020, 9:25 PM IST
Tags: Punjab

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading