पती-पत्नीला कोरोनामुक्त घोषित करुन केली फुलांची उधळण, नंतर समोर आली धक्कादायक बाब!

पती-पत्नीला कोरोनामुक्त घोषित करुन केली फुलांची उधळण, नंतर समोर आली धक्कादायक बाब!

आरोग्य यंत्रणेनेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 23 मे: आरोग्य यंत्रणेनेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोरोनाबाधित दाम्पत्याचा तिसरा अहवाल येण्याआधीच रुग्णालय प्रशासनाने कोरोनामुक्त घोषित केलं. एवढंच नाही तर फुलांची उधळण करत दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, रात्री उशिरा आलेल्या अहवालात दाम्पत्य पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा.. पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाबधितांचा आकडा गेला 5 हजारांवर

कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील पती-पत्नीचा देखील समावेश होता. त्यांच्यावर कळंब रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन दोन चाचणी घेण्यात आल्यानंतर गुरुवारी तिसऱ्या चाचणीसाठी पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. पण, दोन चाचण्याची अहवाल निगेटिव्ह आल्याचे पाहून तिसर्‍या चाचणीचा अहवाल येण्याआधीच या दाम्पत्याला रुग्णालय प्रशासनाकडून कोरोनामुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. दाम्पत्याला डिस्जार्ज देण्यात आला. एवढंच नाही तर रुग्ण बरे झाले या आनंदानं त्यांच्यावर रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांच्यावर फुलांची उधळणही करण्यात आली होती. आता महिलेच्या कोविड-19 चाचणीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला.

नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात आले होते. दरम्यान, रुग्णाची प्रकृती ठीक आहे. राज्य शासनकडून नवीन मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसारच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्य शासनाने काही नवीन सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती. मात्र, आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णाची कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णाला आता 14 ऐवजी सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो पॉझिटिव्ह आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही.

हेही वाचा..दोन वेळच्या खाण्याचे वांदे असतानाही हरला नाही हिम्मत, खेचून आणलं त्यानं यश

मध्यम लक्षणे असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुटी दिली जाणार आहे; परंतु सुटी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप नसावा किंवा ऑक्सिजनची गरज भासू नये, अशी अट आहे.

First Published: May 23, 2020 08:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading