दोन वेळच्या खाण्याचे वांदे असतानाही हरला नाही हिम्मत, खेचून आणलं त्यानं यश

दोन वेळच्या खाण्याचे वांदे असतानाही हरला नाही हिम्मत, खेचून आणलं त्यानं यश

कितीही वाईट परिस्थिती आली तरी डगमगून जात नाहीत. स्वत:वर विश्वास ठेवतात आणि आपल्या मार्गानं पुढे जात राहतात.

  • Share this:

मुंबई, 23 मे : आपल्या आयुष्यात छोट्या गोष्टींवरून आपण हार मानतो आणि रडायला सुरुवात करतो. पण असे काही लोक असतात जे कितीही वाईट परिस्थिती आली तरी डगमगून जात नाहीत. स्वत:वर विश्वास ठेवतात आणि आपल्या मार्गानं पुढे जात राहतात. एकदा आपलं ध्येय ठरवलं की झपाटल्यासारखं त्याच्या सातत्यानं मागे लागायचं मग अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमान उभं राहायचं आणि यश खेचून आणायचं या ओळी प्रत्यक्षात साकारणाऱ्या अभिजित पवार यांची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.

अभिजित यांच्या घरची परिस्थिती गरीब होती. आई शेतमजुरी करायची. घरात पीठ नसल्यानं भाकरी किंवा इतर चोचले नव्हते. ताटात येणाऱ्या भातावरच भूक भागवावी लागायची. अभिजित यांचं प्राथमिक शिक्षण चिकुर्डे गावात झालं. पुढच्या शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्यानं आईनं मामाच्या गावी पाठवून दिलं.

हुशात असल्यानं दहवीला चांगले मार्क मिळाले पण विज्ञान शाखेचा खर्च परवडणारा नसल्यानं कला शाखेत प्रवेश घेतला आणि वारणा इथून पुढील शिक्षण पूर्ण केलं. सकाळी जनावरांसाठी शेतातून गवत आणणे आणि त्यानंतर दिवसभर ग्रंथालयात बसून अभ्यास करणं असा त्यावेळी दिनक्रम असायचा. घरी आल्यानंतर रात्री एकपर्यंत अभ्यासातच असायचे.

हे वाचा-12 वी नापास झाल्यावर प्रियसीची मागितली साथ, जिद्दीच्या जोरावर झाले IPS अधिकारी

पेट्रोल पंप, वारणा दूध संघ, वेळ पडली तर वाळूच्या ठेक्यावरही त्यांनी उदर्निवाहासाठी कामं केली. ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या आईलाही तो मदत करायचे. यासगळ्यात मात्र शिक्षण सुटू दिलं नाही. पुस्तकांसोबत राहण्याचा त्याचा निश्चय अढळ होता. 2013 साली त्यांना पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीपर्यंत जाण्याचं बळ मिळालं पण ती संधी अगदी थोडक्यासाठी चुकली. पण डगमगून न जाता मात्र पुन्हा ते नियोजन करून अभ्यास आणि काम दोन्ही सांभाळून तयारीला लागले. साधारण 11 तास झपाटून अभ्यास करायचे आलेलं अपयश मागे सारत नव्यानं सुरुवात करून त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा देऊन यश खेचून आणलं.

हे वाचा-Success story: कोचिंग क्लास न करता जिद्दीच्या जोरावर नर्स झाली IAS

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2020 07:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading