मुंबई, 28 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी (28 जून) दुपारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न केले. तसेच राज्यातील अनलॉकबाबत आणि इतर गोष्टींवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केलं. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना एक कळकळीची विनंती केली आहे.
जसं रक्तदान करतो, तसं प्लाझ्माही दान करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त रुग्णांना केलं आहे. प्लाझ्मा थेअरी आपण मार्च-एप्रिलपासून सुरुवात केली आहे. सुरुवातीला एक-दोन ठिकाणी त्याचा यशस्वी वापर करण्यात आला. त्यातून सहा ते सात रुग्ण बरे झाले आहेत.
हेही वाचा...CM या नात्यानं नाही तर तुमचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, राज्यात प्लाझ्मा थेअरीचा आपण जास्त प्रमाणात वापर करणार आहोत. प्लाझ्मा थेअरीचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरणार आहे.
एसक्यू, हायड्रो, रेन्डीझसह कोरोनावरील आपण सगळीच औषध वापरत आहोत. केंद्राकडे औषध वापरण्यासाठी पाठपुरावा केला होता. फॅव्हिकिल औषधाचा पुरवठा राज्यात वाढवणार आहोत. किंमतीची चिंता करू नका, राज्य सरकार त्यासाठी आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
लॉकडाऊनबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. लॉकडाऊनबद्दल काही शहरं विचारणा करत आहे. पण लॉकडाउन करण्याचा निर्णय हा तुमच्यावर सोपवणार आहे. काही भागात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर त्या ठिकाणी लॉकडाऊन लागू करावा लागणार आहे. राज्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा...30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.