नवी दिल्ली, 28 जून : चीनच्या सगळ्यात लोकप्रिय अशा शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटोकने (TikTok) सर्व सोशल मीडियावर असलेल्या प्रोफाईलला (profile photo) भारताच्या झेंड्याचा फोटो लावला आहे. याआधी फेसबुक (facebook) आणि ट्विटरवर (twitter) फक्त त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्येच टिकटॉकचा लोगो दिसत होता, पण आता या दोन्ही ठिकाणी लोगोच्या उजव्या बाजूला भारताचा झेंडादेखील दिसतो आहे.
एकीकडे भारत आणि चीनमधील तणाव त्यात चीन वस्तू आणि अॅपवर घालण्यात आलेली बंदी जोर धरत आहेत. त्यामुळे लोगाच्या ठिकाणी भारताचा झेंडा लावल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आधीपासून TikTok वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आहे. अशा परिस्थितीत प्रोफाईल फोटोवर भारताचा झेंडा लावल्याने नेटकरी चिडले आहेत. TikTokच्या ऑफिशिअल पेजवर 1.5 कोटी पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. शनिवारी संध्याकाळी अॅपचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला आहे.
TikTokने प्रोफाईल फोटोमध्ये झेंडा लावल्यामुळे नेटकरी प्रचंड चिडले आहेत. फेसबुकच्या प्रोफाईल फोटोवर बर्याच वापरकर्त्यांनी 'RIP' लिहून कमेंट्स केल्या आहेत. खरंतर, लडाखमध्ये झालेल्या एलएसीवरील वाढत्या ताणामुळे बर्याच भारतीयांनी स्मार्टफोनमधून अनेक चिनी अॅप्स डिलीट केले आहेत. त्याचा फटका चीनला बसत आहे. त्यामुळे भारतीयांची समजूत काढण्याची चीन असे प्रकार करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
संपादन - रेणुका धायबर