'तू पांढऱ्या पायाची म्हणत' पती आणि सासूने नवविवाहितेला पेटवलं, बीडमधील खळबळजनक घटना
'तू पांढऱ्या पायाची म्हणत' पती आणि सासूने नवविवाहितेला पेटवलं, बीडमधील खळबळजनक घटना
या तिघांनी 'तू पांढऱ्या पायाची आहेस' असे म्हणून प्रतीक्षाचा छळ सुरू केला. तसंच, हुंड्यापोटी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला मारहाण करून उपाशीपोटी ठेवले.
या तिघांनी 'तू पांढऱ्या पायाची आहेस' असे म्हणून प्रतीक्षाचा छळ सुरू केला. तसंच , हुंड्यापोटी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला मारहाण करून उपाशीपोटी ठेवले.
बीड, 16 मे : 20 वर्षीय तरुणीला तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणत पतीसह सासू , सासऱ्याने पेट्रोल (petrol) ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (beed) घडली आहे. मात्र नशिब बलवंत्तर तावडीतून सुटका करून घेत कसाबसा जीव वाचविला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा अजय राजगुडे असं नवविवाहितेचं नाव आहे. अडीच महिन्यापूर्वी प्रेम विवाह केलेल्या प्रतीक्षा आणि अजय सुरेश राजगुडे याच्यासोबत 12 फेब्रुवारी रोजी पळून गेली होती. परत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी २३ फेब्रुवारी रोजी त्यांचे लग्न लावून दिले. सुरुवातीला एक महिना चांगला संसार चालला.
पण त्यानंतर अजय, सासरा सुरेश शहादेव राजगुडे आणि सासू संगीता सुरेश राजगुडे या तिघांनी 'तू पांढऱ्या पायाची आहेस' असे म्हणून प्रतीक्षाचा छळ सुरू केला. तसंच , हुंड्यापोटी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला मारहाण करून उपाशीपोटी ठेवले.
(OMG! पगारात रोख रक्कम नाही तर 'सोनं' ऑफर करते ही कंपनी; काय आहे यामागील कारण?)
दोन दिवसांपूर्वी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्या तिघांनी संगनमताने प्रतीक्षाच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तेव्हा प्रतीक्षाने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घराबाहेर पळ काढला आणि पेटलेली साडी मातीत घुसून विझवली. त्यानंतर नैराश्यातून ती जीव देण्यासाठी विहिरीकडे पळू लागली. तेंव्हा नातेवाईकांनी तिला अडवले. या घटनेनंतर पीडित महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून प्रतीक्षाचा पती, सासरा आणि सासूवर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या पत्नीच्या मदतीने सवतीचा आणि मुलीचा केला निर्घृण खून, जालन्यातील घटना
दरम्यान, दोन बायका असलेल्या एका नवऱ्याने आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलीचा खून केल्याची खळबळजनक घटना जालना शहरातील रेल्वेस्थानकाजवळील सोनलनगर भागात उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती गणेश सातारे ( वय 36) आणि मुलगी वर्षा गणेश सातारे (वय 17) असं मयत मायलेकीचं नाव आहे. या दोघी मायलेकींचे मृतदेह आज सकाळी त्यांच्या राहत्या घरात आढळून आले.
(आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video)
घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस तातडीने घटनास्थली दाखल झाले. दोघी मायलेकीचे मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत. या दोघी मायलेकीच्या निर्दयी खूनामुळे सोनलनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून हा खून गणेश सातारे यानेच आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलासोबत हा खून केल्याचा प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी गणेश उर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी सीमा सातारे आणि १६ वर्षाचा मुलगा, आशा तीन जणांविरुद्ध भादंवि. 302, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करून, त्यांना ताब्यात घेतले आहे. मयत मायलेकीवर रामतीर्थ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.