मुंबई, 23 मार्च : सायन रुग्णालयाच्या मराठी वाड्ग्मय मंडळाच्या वतीनं दरवर्षी वसंतोत्सव साजरा केला जातो. यावर्षी वसंतोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं . मनसेच्या वतीनं गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ही दीपोत्सवाची संकल्पना नेमकी कशी सूचली हे सांगताना राज ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला.
काय म्हणाले राज ठाकरे?
दीपोत्सवाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी असाच खिडकीमधून बाहेर पहात होतो. माझी नजर शिवाजी पार्ककडे गेली. ते दिवाळीचे दिवस होते. पण मला शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र अंधार दिसला. उदास वातावरण होतं. यातूनच दीपोत्सवाची संकल्प समोर आली. गेल्या दहा वर्षांपासून मनसेकडून दीपोत्सव साजरा केला जात असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
समुद्रातील 'ती' जागा 600 वर्ष जुनी; काय आहे माहीम दर्गा ट्रस्टचा दावा?
अतिक्रमण हटवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात माहीम दर्गा परिसरात समुद्रात अतिक्रम झाल्याचा आरोप केला होता. हे अतिक्रमण महिनाभरात हटवले न गेल्यास आम्ही तिथे गणपतीचं मंदिर उभारू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाकडून हे अतिक्रम हटवण्यात आलं आहे. यावर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल बोललो आज कारवाई झाली. यातूनच कळत कोणच्या शद्बाला किती वजन आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray