मुंबई, 23 मार्च : माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात केला होता. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात असणाऱ्या मजारीचा उल्लेख केला. महिनाभरात हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे, अन्यथा आम्ही तिथे गणपती मंदिर उभारू असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर माहिम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
नेमकं काय म्हणाले खंडवानी?
राज ठाकरे यांनी ज्या जागेचा उल्लेख केला आहे, ती जागा सहाशे वर्ष जुनी आहे. आम्ही त्या ठिकाणी कोणतही अनधिकृत बांधकाम अथवा दर्गा उभारणार नाही. ती जागा चिल्ला आहे. जिथे धर्मिक शिक्षण दिलं जातं. त्या जागेच्य आजूबाजूला कोणतंही अनधिकृत बांधकाम झालं असेल तर सरकारने ते पाडावं असं खंडवानी यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या आरोपानंतर माहीममधील 'त्या' अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कारवाई
दरम्यान माहीम दर्गा परिसरात समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवर आयोजित पाडवा मेळाव्यात केला होता. राज ठाकरे यांच्या या आरोपाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. माहीम दर्गा परिसरातील हे अनधिकृत बांधकाम अखेर पाडण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.