मुंबई, 8 ऑक्टोबर : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवल्याने वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. त्याशिवाय शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. दोन्ही गटाने नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे. त्यानंतरच कोणाला कोणतं चिन्ह ही बाब स्पष्ट होईल. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीतही शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसल्याचं समोर आलं आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. याचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. अद्याप या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची चर्चा आहे. तर येथे भाजपकडून मुरजी पटेल यांच्याही नावाची चर्चा आहे. मनिषा कायंदेची ती भीती ठरली खरी…; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय स्फोट या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून हे चिन्ह गोठवड्यात आले आहे. सोमवारी 1 वाजेपर्यंत शिंदे आणि ठाकरे गटाला पर्यायी चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर करावे लागणार आहे. यानंतरच ठाकरे अंधेरीची निवडणूक कोणत्या चिन्हाने लढतात हे स्पष्ट होऊ शकेल.