मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अजित पवारांनी त्यांच्या भाषणात शरद पवारांबाबत काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. शरद पवारांनी आता आराम करावा, असा सल्लाही अजित पवारांनी दिला, एवढच नाही तर त्यांनी विधानसभेत राष्ट्रवादी किती जागांवर लढणार? याचा आकडाही त्यांनी सांगितला. आता आराम करा तुमचं वय 82 झालं 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? महाराष्ट्राच्या राजकारणात जे चार-पाच प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव येतं का नाही, मग मला आशिर्वाद का दिला जात नाही? आमच्या दैवताला विनंती आहे, पांडुरंगाने विठ्ठलाने आशिर्वाद द्यावा. वरिष्ठांनी आराम करावा, हट्टीपणा कमी करावा. वरिष्ठांनी थांबलं पाहिजे आशिर्वाद दिले पाहिजेत. चुकलं तर सांगा दुरुस्त करीन, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना आरामाचा सल्ला दिला. साहेबांना वाईट वाटलं असेल, पण…वसंतदादा ते धनंजय मुंडे, छगन भुजबळांनी इतिहासच काढला किती जागा लढणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आता 54 जागा आहेत, त्या आपल्याला मिळणारच आहेत, पण त्याशिवाय काँग्रसच्या जागाही मिळणार आहेत. 90 च्या आसपास जागा आपल्याला मिळणार आहेत. राष्ट्रवादीचा 71 चा आकडा पुढे घेऊन जाणारच, महाराष्ट्र पिंजून काढणार. पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरू, असं अजित पवार म्हणाले आहेत. समोर बीआरएस वंचित आहे त्यांची एकत्र यायची शक्यता दाट आहे, काँग्रेस-शिवसेनेची आघाडी कशी होणार माहिती नाही, त्यात बऱ्याच खाचाखोचा आहेत, असं विधान अजित पवारांनी केलं. मला व्हिलन केलं अनेक गोष्टी सहन केल्या अनेकदा माघार घेतली अनेकदा गुगली टाकली आणि सहन केलं. अनेकदा सांगितलं एक आणि निर्णय वेगळा घेतला. अध्यक्षपदाचा राजीनामा देतो सांगितलं, दोन दिवसामध्ये वेगळा निर्णय घेतला. राजीनामा द्यायचाच नव्हता मग मागे कशाला घेतला? यशवंतराव चव्हाण सेंटरच्या त्या बैठकीत मलाच व्हिलन केलं गेलं, पण मला जे सांगितलं ते मी केलं. परदेशीचा मुद्दा निघाला पण चार महिन्यात बासनात गुंडाळला, तेव्हापासून सोनिया गांधी युपीए प्रमुख म्हणून काम करत आहेत, असा टोलाही अजित पवारांनी शरद पवारांना लगावला. 2019 ला उद्योगपतीच्या घरी बैठक झाली होती, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.