सोलापूर, 30 ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका हॉटेलमध्ये वेटरनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ शहरात असलेल्या रुची हॉटेलमधील किचनमध्ये कुजलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह आढळला आहे. हॉटेलमधून दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा...धक्कादायक! सोलापुरात काळवीटाची शिकार, मटन विकताना आरोपीला बेड्या
कुलदीपसिंग मरावी असे या आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव असून तो मुळचा मध्यप्रदेशचा रहिवासी होता. लॉकडाऊन काळात हॉटेल बंद असल्यानं हॉटेलमध्ये एकूण तीन कामगार मुक्कामी होते. मात्र, त्यापैकी दोघांना ई-पास मिळाला होता. त्यामुळे ते आपल्या मुळ गावी निघून गेले होते. परंतु कुलदीपसिंग मरावी याला ई-पास न मिळाल्याने तो हॉटेलमध्येच मुक्कामी होता. दरम्यान, रविवारी हॉटेल परिसरात दुर्गंधी पसरल्यानं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
किचनमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह....
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर कामगाराचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. यामध्ये लोखंडी रॉडला पडदा अडकवलेला होता. त्या पडद्याला गळ्याची हाड चिटकलेले होते. तर उर्वरीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत खाली पडल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा...अनेकांना कोरोना होऊन गेला हे त्यांच्या लक्षातही आलं नाही; काय म्हणाले मनसे नेते
कुलदीपसिंग मरावी यांनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज मोहोळ पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, कुलदीपसिंग मरावी यांची हत्या झाली नसावी का, या अँगलनं देखील पोलिस तपास करत आहेत. मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.