मुंबई, 30 ऑगस्ट: राज्यात अनेकांना कोरोना होऊन गेला, हे त्यांच्या लक्षातही आलं नाही, अशी माहिती विविध सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आता संपूर्ण राज्यात 'अँटी बॉडी' टेस्ट करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
हेही वाचा...रुग्णालयात बेड नसल्यानं कारण देत महिला रुग्णाला रस्त्यावरच लावला ऑक्सिजन
बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून राज्य सरकारला विनंती केली आहे की, सरकारनं संपूर्ण राज्यात 'अँटी बॉडी' टेस्ट करण्यावर सरकारनं जास्त जोर द्यायला हवा. कारण राज्यात अनेकांना कोरोना होऊन गेला हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. त्यामुळे अशा अॅंटी बॉडी टेस्टद्वारे एकूण लोकसंख्येच्या मोठ्या संख्येने नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे, ते आपल्या लक्षात येईल. विशेष म्हणजे, अशा लोकांना घरात थांबण्याची काहीच आवशक्यता नाही. अशा लोकांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव देखील होत नाही, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे अशा टेस्ट द्वारे एकूण लोकसंख्येच्या मोठ्या हिस्स्या ने ज्याने कोरोना वर मात केली ते आपल्या लक्षात येईल व अशा लोकांना घरात थांबण्याची काहीच आवश्यकता नाही कारण ही लोक कोरोनाचा प्रसार देखील करीत नाहीत त्यामुळे अशा लोकांना त्यांची कामे पूर्वीप्रमाणे करून
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 30, 2020
देण्याची मुभा दिल्यास अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास खुप मोठी मदत होईल. तसेच खासगी लॅब चालकांना "अँटी बॉडी" चे दर जे सध्या जवळपास हजार रुपये आहेत ते कमी करण्याचे निर्देश दिल्यास अनेक लोक स्वतःहून सुद्धा ती टेस्ट करवून घेतील व यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 30, 2020
...तर अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत होईल!
कोरोनावर मात केलेल्या नागरिकांन त्यांची कामे पूर्वीप्रमाणे करू देण्याची मुभा दिल्यास राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास मोठी मदत होईल. तसेच खासगी लॅब चालकांना 'अँटी बॉडी'चे दर जे सध्या जवळपास हजार रुपये आहेत, ते कमी करण्याचे निर्देश द्यावे. जेणे करून अनेक लोक स्वतः हून सुद्धा अॅंटी बॉडी टेस्ट करून घेतील. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल, असं देखील बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...केंद्राने 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवायला सांगितल्या, मग परीक्षा कशा घेणार?'
बंद करा...'कोरोना'ची कॉलर ट्यून
बाळा नांदगावकर यांनी याआधी 'कोरोना'च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून त्वरित बंद करण्याची मागणी केली होती. बहुतांश लोक या ट्यूनला कंटाळले आहेत. त्याच प्रमाणे आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही, असं नांदगावकर यांनी ट्विटरवर म्हटलं होतं. कोरोनाबाबत जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी