चिंतेत आणखी भर! नाशकात हॉस्पिटल फुल्ल, 10 दिवसांत आढळले 1200 कोरोनाबाधित रुग्ण

चिंतेत आणखी भर! नाशकात हॉस्पिटल फुल्ल, 10 दिवसांत आढळले 1200 कोरोनाबाधित रुग्ण

नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी रुग्णालये आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

  • Share this:

नाशिक, 28 जून: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नाशिक शहर आणि जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांत 1200 हून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शहरातील या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नाशिक शहरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालये रुग्णांनी अक्षरश: हाऊस फुल्ल झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासाठी हलचाली सुरू केल्या आहेत. यासाठी विशेष पथकही तयार केलं आहे.

हेही वाचा..भयंकर! लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान झाल्यानं प्रतिष्ठित शाळेचा मालक बनला ब्लॅकमेलर!

विशेष म्हणजे नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागातील रुग्ण देखील उपचार घेण्यासाठी दाखल होत आहे. त्यामुळे शहरातील शासनाने अधिग्रहीत केलेले हॉस्पिटल रुग्णांनी खच्चून भरले आहेत. परिणामी नव्यानं पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याची चित्र समोर आले आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी रुग्णालये आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी पालिका प्रशासनानं स्वतंत्र पथक देखील तयार केलं आहे. हे पथक नव्या कोरोनाबाधित रुग्णाना योग्य उपचार मिळतील, यासाठी सहकार्य करणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोदिराम सोनकांबळे यांनी दिली आहे.

हेही वाचा..अमेरिकेत ही कंपनी करतेय कोरोनावरच्या औषधाची अंतिम चाचणी, 4 महिन्यांत लस बाजारात

नाशिक शहर आणि जिल्ह्यात आतापर्यंत 3800 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर सद्यस्थितीत नाशिक शहर आणि जिल्ह्यात 1500 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासनानं वेळीच जागं होऊन कोरोनाबाधितांसाठी अतिरिक्त बेडची व्यवस्था करने गरजे आहे. अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

First published: June 28, 2020, 6:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या