न्यूयॉर्क 28 जून: जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर (Coronavirus) अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. त्यात प्रगतीही होत आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असतानाच अमेरिकेची मोठी औषध निर्माता कंपनी असलेल्या फायझरने (Pfizer) पुढच्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत यावर लस तयार होईल असा दावा केला आहे. Pfizer चे CEO अल्बर्ट बॉरला (Albert Bourla) यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, कंपनी गेली काही महिने यावर संशोधन करत असून ते अंतिम टप्प्यात आलं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यात निर्णायक प्रगती होईल असा दाही त्यांनी केला. फायझर जर्मनीची कंपनी बायोटेक (Biotech)च्या मदतीने अमेरिका आणि युरोपसाठी औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या आधीही अनेक कंपन्यांनी औषधाच्या मानवी चाचण्या सुरू असल्याचा दावा केला होता. कुठल्याही औषधाचं संशोधन आणि ते औषध सर्व चाचण्यानंतर बाजारात यायला किमान 5 ते 7 वर्ष लागतात. मात्र सध्याची अभूतपूर्व स्थिती बघता हे औषध कमीत कमी वेळेत बाजारात आणण्यासाठी जगभर प्रयत्न होत आहेत. कोरोना झाला तर 2 लाख रुपये देणार; या देशाची परदेशी पर्यटकांना ऑफर या औषधाच्या किमान चाचण्या करून ते मानवी शरीरासाठी घातक नाही याची खात्री करून घेतली जात असून त्यानंतर त्याच्या वापराबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर दरम्यान, कोरोनाव्हायरस (Coronavirus) जेव्हा जगभरात मोठ्या वेगानं पसरत होता तेव्हा त्याच्या टेस्ट किटबाबत अनेक चर्चा होत्या. जगभरात कोरोना पसरवलेल्या चीननं स्वतःच कोरोना टेस्ट किट तयार करून इतर देशांना महागड्या दरानं विकल्या. यातील बर्याच किट सदोष असल्याचे आढळले आणि त्यांचे परिणाम अचूक असल्याचे आढळले नाही. संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.