बीड, 26 जुलै: पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांने पॅरोलवर गावी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. भरत ताराचंद पवार असं आत्महत्या करणाऱ्या कैद्याचं नाव आहे.
हेही वाचा...अंधश्रद्धेचा बळी! अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी मायलेकाचा घेतला जीव
भरत पवार हा एक महिन्याच्या पॅरोलवर आला होता. दोन दिवसांनंतर भरतची पॅरोल संपणार होती. मात्र, रविवारी दुपारी 2 च्या सुमारास झाडाला गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली. चार वर्षापूर्वी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी भरत तुरुंगात गेला होता.
मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील जातेगाव गावखोर तांडा भरत ताराचंद पवार यानं कॅनलच्या शेजारी असलेल्या उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसांपासून भरत मानसिक तणावात वावरत होता. याच नैराश्येतून भरत याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणात तलवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा...धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जात आहे 'एक्सपायर्ड मेडिसिन'
भरत याने चार वर्षापूर्वी कौटुंबीक वादातून पत्नीची हत्या केली होती. या गुन्हात तो शिक्षा भोगत होता. पुढील दोन दिवसांत त्याची पॅरोलचा मूदत संपणार होती. नंतर तो औरंगाबादेतील हर्सुल तुरुंगात परत जाणार होता. मात्र, त्याआधीच त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. भरत यांने शिक्षेच्या भीतीने जीवन संपवले, असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. तलवडा पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathwada