VIDEO :भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार, मद्यधुंद चालकानं उडवली अनेक वाहनं

VIDEO :भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार, मद्यधुंद चालकानं उडवली अनेक वाहनं

भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार रविवारी जळगावकरांना पाहायला मिळाला.

  • Share this:

जळगाव, 26 जुलै: भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार रविवारी जळगावकरांना पाहायला मिळाला. मद्यधुंद कंटेनर चालकाने अनेक वाहनांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जळगाव शहरात हा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मद्यधुंद चालकानं शहरातील पोलीस चौकीला धडक दिली आणि याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्या दारुच्या नशेत तर्तर्त असलेल्या चालकाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा...बीड हादरलं! पत्नीच्या हत्येची भोगत होता शिक्षा, पॅरोलवर सुटून आल्यानंतर केलं असं

मिळालेली माहिती अशी की, नेरी ते जळगाव शहरातून अजिंठा चौफुली ते रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनर चालकानं अनेक वाहने उडवल्याचा थरारक प्रकार रविवारी दुपारी घडला. भरधाव कंटेरनेर नेरी ते जळगावदरम्यान अनेक वाहने उडवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय- 39 रा. कर्हे वडगाव, ता.आष्टी जि. बीड) असं कंटेनर चालकाचं नाव आहे. चालकाला मद्यधुंद अवस्थेत शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भरधाव कंटेनर येत असल्याचे बघताच अनेक जणांनी रस्त्यावरून बाजूला होत आपला जीव वाचवला. अन्यथा आज जळगाव शहरात मोठी हाहाका उडाला असता. या घटनेत अनेक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा..अंधश्रद्धेचा बळी! अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी मायलेकाचा घेतला जीव

दरम्यान, सुरक्षारक्षकाच्या कपाळाला पिस्तूल लावून तीन कैदी पळाल्याच्या घटनेनं शनिवारी जळगाव शहर हादरलं होतं. जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये होणाऱ्या हाणामारी, कैद्यांना भेटणाऱ्यांवर होणारे हल्ले, तसेच कैदी पळून जाणं, अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात शनिवारी सकाळी साडेसात वाजता तीन कैद्यांनी थेट सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली.  धक्कादायक म्हणजे, तिन्ही गुन्हेगारांना घेण्यासाठी चक्क एक दुचाकीस्वार कारागृहाबाहेर आला होता. त्यामुळे या घटनेमुळे पोलिस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 26, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या