सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीबाबत काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चौकशीबाबत काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री

CBI ने या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 6 जणांविरुद्ध FIR दाखल केला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

नागपूर, 8 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (sushant singh rajput Suicide) प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. या प्रकरणी आता CBI चौकशीला सुरुवात झाली आहे. CBI ने या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 6 जणांविरुद्ध FIR दाखल केला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा...SSR Death : रियाच्या चौकशीनंतर सिद्धार्थ पिठानी, रितेश शहा नोंदवणार ED समोर जबाब

अनिल देशमुख शनिवारी नागपूरात होते. तिथे त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्री म्हणाले, या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 11 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर सीबीआय चौकशीबाबत निर्णय घेतला जाईल.

सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम असल्याचा पुनरच्चार देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी यावेळी केला.

CBIच्या डॅशिंग महिला IPS अधिकारी करताहेत सुशांत प्रकरणाची चौकशी

दरम्यान, CBIचं विशेष पथक या प्रकरणी चौकशी करत असून त्यात डॅशिंग महिला IPS अधिकारी गगनदीप गंभीर यांचाही चौकशी पथकात समावेश आहे. बिहार सरकारने या प्रकरणात गुन्हा दाखल करत CBIची शिफारस केंद्राकडे केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने या चौकशीला मान्यता दिल्याने आता सगळं लक्ष सीबीआय चौकशीकडेच राहणार आहे.

CBIची ही SIT एस.पी. नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. गगनदीप या 2004च्या गुजरात कॅडरच्या IPS अधिकारी असून त्यांनी गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम केलं आहे. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

हेही वाचा...क्रुरतेचा कळस! झोपलेल्या 7 वर्षीय चिमुरडीला उचलून नेत केला सामूहिक अत्याचार

उत्तर प्रदेशातला खाण घोटाळा, ऑगस्ट वेस्टलँड प्रकरण, बिहारमधला सृजन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी त्यांनी केली होती. गगनदीप या गुजरात कॅडरच्या अधिकारी असल्या तरी त्यांचं बिहारशीसुद्धा नातं आहे. त्यांचा जन्म हा बिहारच्या मुजफ्फरपूर इथला असून त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे तिथेच झालं आहे. दीड वर्षांपूर्वी त्या प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये आल्या आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: August 8, 2020, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading