पुणे 16 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली. यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, असं त्यांनी म्हटलं. सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यावर आता हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोध करण्यांवर त्यांनी टीका केली आहे. …तर मी वंदे मातरम म्हणणार नाही, आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचे भान ठेवायला हवे, छगन भुजबळांची जोरदार टीका सरकारने अखंड भारतानंतर आधी वंदे मातरम हेच राष्ट्रगीत करून दाखवावे, अशी मागणी त्यांनी केलं. दवे म्हणाले, की यांना वंदे मातरमची अडचण नाही, तर हिंदूंना जे आवडतं त्या गोष्टींना आडवं येण्याचा यांचा स्वभाव आहे. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, हिजाब बंदी ऐकणार नाही, अयोध्येचा निकाल मानणार नाही, 370 चालणार नाही, समान नागरी खपणार नाही, असंच यांचं सुरू असतं. उद्या हे घटना मानायला पण नकार देतील. परवा कायदे वेगळे करा सांगतील, नंतर सुट्टी वेगळी मागतील, प्रार्थना वेगळी, वेळ वेगळी, जागा वेगळी आणि नंतर परत एकदा देशच वेगळा करतील, असंही दवे म्हणाले. त्यामुळे हे लाड आता नकोच, असं मतही त्यांनी मांडलं. श्वास कुठून घ्यायचा हेपण तुम्हीच ठरवणार? वंदे मातरमच्या निर्णयावरुन वादंग पुढे ते म्हणाले, हे हुतात्मा स्मारक फोडणार, लोकांचे गळे कापणार, पोलीस सरकवा म्हणणार, अफजल आणि औरंगजेबाची कबर पूजणार, हे सगळं आता थांबायला हवं. आता वंदे मातरमलाच राष्ट्रागीत करावे आणि देशातील प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.