मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

श्वास कुठून घ्यायचा हेपण तुम्हीच ठरवणार? वंदे मातरमच्या निर्णयावरुन वादंग

श्वास कुठून घ्यायचा हेपण तुम्हीच ठरवणार? वंदे मातरमच्या निर्णयावरुन वादंग

फाईल फोटो

फाईल फोटो

सांस्कृतिक कार्यमंत्री होताच मुनगंटीवार यांनी काल शनिवारी मोठी घोषणा केली. "सांस्कृतिक विभागाचा मी पहिला संकल्प महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय. हॅलो नाही तर वंदे मातरम् बोला.

    मुंबई, 15 ऑगस्ट : राज्यात शासकीय कार्यालयात आता 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्'ने संभाषणाला सुरुवात होणार आहे. काल शनिवारी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधत मुनगंटीवार यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे राज्यातील सरकारी कर्मचारी फोनवर संभाषण करतानाची सुरुवात 'हॅलो'ने नाही तर 'वंदे मातरम्'ने करतील. यावरुन माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड - जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप करत म्हटले की, भारतीय संस्कारांत नमस्कार आहे, अनेक जण जय भीम म्हणतात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात, कोणी सतश्रीअकाल म्हणेल. भारतात स्वातंत्र्य आहे, लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, आता तोसुद्धा तुम्हाला विचारुन घ्यायचा का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की, 'तुम्हाला सुधीर मुनगंटीवार म्हणायचं, सुधीर मुनगंटीवारजी म्हणायचं, सुधीरजी मुनगंटीवार म्हणायचं की सुधीर भाऊ म्हणायचं तेही जाहीर करून टाका. आता, महाराष्ट्रात आम्हाला यापुढे या-या नावाने हाक मारा, अशी लीस्टच जाहीर करुन टाका, असा खोचक टोलाही आव्हाड यांनी मुनगंटीवार यांना लगावला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, तो श्वास कुठून कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का?'', अशी जोरजबरदस्ती करू नका, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. हेही वाचा - बांध्यावरून थेट बंदरावर, मंत्रिपदावर नाराज? अखेर दादा भुसेंनी केला खुलासा राज्य मंत्रिमंडळाचं काल खातेवाटप जाहीर करण्यात आल्यानंतर यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक कार्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय मुनगंटीवार यांना वन खात्याची देखील जबाबदारी मिळाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री होताच मुनगंटीवार यांनी काल शनिवारी मोठी घोषणा केली. "सांस्कृतिक विभागाचा मी पहिला संकल्प महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय. हॅलो नाही तर वंदे मातरम् बोला. आता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत मोबाईलवरुन हॅलो ऐवजी वंदे मातरम् बोलून संभाषणाला सुरुवात करा", असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jitendra awhad, Sudhir mungantiwar

    पुढील बातम्या