कोल्हापूर, 19 जुलै: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केली.
चंदगड तालुक्यातील सीमा भागात राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरू करणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी कोल्हापुरात दिली. त्याच बरोबर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतही उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला.
हेही वाचा...'तो' व्हायरल व्हिडीओ एडिट केलेला, उदय सामंताकडून खासदार पुत्राची पाठराखण
मुलांच्या पालकांनी चिंता करू नये. कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
राज्य सरकारला परीक्षाच घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. राज्य सरकारने दोनदा निर्णय घेतला होता. अंतीम वर्षाच्या परीक्षा आताच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यातही सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणं शक्य नाही. अचानक कोरोनाचे संकट दूर होणार आहे का? असा सवाल देखील उदय सामंत यांनी उपस्थित केला.
युजीसीने राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी कसे काय येऊन परीक्षा देतील, तेही युजीसीने सांगावं. राज्यातल्या सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं हे काम काय रोबोट करू शकणार नाहीत, असही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा... ...आणि शरद पवारांनी 87 वर्षांच्या 'तरुण' कार्यकर्त्यासाठी थांबवला ताफा, पाहा हा
विनोद तावडे यांना सामंत यांचं प्रत्युत्तर...
मी 60 जीआर काढून ते मागे घेतले नाही. मी एकच जीआर काढला आणि त्याच्या मागे लागलो. परीक्षांचं कुणीही राजकारण करू नये, विद्यार्थ्यांच्या भवित्यव्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत उदय सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.