जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात पावसानं हाहाकार! पुढचे 24 तास रेड अलर्ट, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

राज्यात पावसानं हाहाकार! पुढचे 24 तास रेड अलर्ट, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

राज्यात कोसळधार, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

राज्यात कोसळधार, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. खेड शहरात मच्छीमार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरत असल्याने खेड शहरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पावसानं चांगलाच जोर धरला आहे. राज्यात कालपासून मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात पावसाने चांगलाच पहाटेपासून जोर धरला आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. खेड शहरात मच्छीमार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरत असल्याने खेड शहरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाडमध्येही मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून, अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड शहरातील सखल भागात पुराचं पाणी शिरलं आहे.

गोगलगाय शेतात येते कुठून? एकदा आली की पुढच्या वर्षाचाही लावते वाट, संपूर्ण माहिती VIDEO

पाणी वाढण्याचा जोर कमी असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, महाडमध्ये पूरस्थिती आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. प्रशासनाने तिथल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. खेडमधील खाडीपट्टा विभागाला जोडणारा खेळ देवणे सुसरी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे तब्बल वीस गावांचा संपर्क तुटलेला आहे.  वीस गावांना जाण्यासाठी एकही मार्ग आता नाही त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. बुलढाणा जिल्ह्यात रात्रभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, मलकापूर तालुक्यात अनेक गावात पाणी शिरल आहे. मलकापूर तालुक्यातील पान्हेरा गावाला पावसाच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला आहे. अजूनही बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.

Weather Update : राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; पुण्यासह या 4 जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुसळधार पावसामुळे गावातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह जनावरांचे जीव धोक्यात येऊ शकतात. प्रशासनाचे तात्काळ पाऊले उचलून उपाययोजना करण्याची मागणी गावकरी करू लागले आहेत. वाशिम जिल्ह्यात रात्रभरापासुन संततधार सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पुर आले आहेत.शेलुबाजार - पिंजर या मार्गावरील वनोजा नाल्याला आलेल्या पुरामुळे शेलुबाजार-पिंजर-माळशेलु-टिटवा हा मार्ग बंद झाला आहे. वर्धा जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पडताहेत जोरदार पाऊस सुरू आहे. सलग सुरू असलेल्या पावसानं जलाशय पातळीत वाढ झाली आहे. लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले असून प्रकल्पातून 12.12 घनमीटर प्रती सेकंदाने विसर्ग सुरू आहे. लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना दिलाय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात