विकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज

विकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज

मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं दोन दिवस जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटला होता. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरीही राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचं धूमशान सुरू आहे. येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस राहिल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

या आठवड्यात संपूर्ण राज्यात मध्यम स्वरुपाचा तर मुंबई-ठाण्यात काही वेळा ढगाळ वातावरण राहिल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर हळूहळू पावासाचा जोर कमी होईल असा हवामान विभागाचा कयास आहे. मागच्या दोन दिवसांत विदर्भ-मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती.

हे वाचा-COVID: आजींच्या चितेला पुराने दिला वेढा, अखेर माणुसकी जिंकली; मन हेलावणारी घटना

18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. येत्या 24 तासांत पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर आणि पावसाच्या हलक्या सरी पडतील.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. नदीपलिकडच्या 5 गावांचा संपर्क तुटला. उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यातही मंगळवारी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली होती.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 18, 2020, 8:22 AM IST

ताज्या बातम्या