जुन्नर 18 सप्टेंबर: कोरोनामुळे अनेक घटना मन विषन्न करणाऱ्या आहेत. माणुसकी मेलीय का असाही प्रश्न विचारला जातो. मात्र संवेदना आणि माणुसकी जिवंत आहे याचा अनुभव जुन्नर तालुक्यात आला. तालुक्यातील बेल्हे परिसरात 16 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी बारा वाजता अचानक एका 60 वर्षाच्या आजींच्या निधनाची बातमी कानावर पडली. या आजींचा मुलाला अंत्यविधी साठी कोणतेही नातेवाईक मदत करत नसल्याने मदतीसाठी तो स्वप्निल भंडारी त्यांच्याकडे येऊन पोहोचला. आजी कोरोना संशयित असल्याने नातेवाईकांची व कोणत्याही जवळच्या व्यक्तींची त्याला मदत मिळाली नाही.
एकटा मुलगा त्याच्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी मदत मागू लागला. अशातच स्वप्निल भंडारी यांनी त्यांचे मित्र गोट्याभाऊ वाघ यांना याबाबत माहिती दिली. व व दोघांनाही मदतीसाठी पुढाकार घेतला. कोणतीही मदत न मिळाल्याने सात तासांच्या प्रयत्नानंतर अॅम्ब्युलन्सची सोय करत मृतदेह स्मशानभूमीत आणला गेला.
या घटनेतून एक गोष्ट पुढे आली की, कितीही पैसा, प्रतिष्ठा, सन्मान असला तरी संकटाच्या वेळी सख्खे नातेवाईकही साथ सोडून देतात आणि अशावेळी फक्त आणि फक्त मैत्रीच कामी येते. हेच धोरण ठेवून गोट्याभाऊ वाघ व स्वप्निल भंडारी यांनी पुढच्या तयारीला सुरुवात केली. यातच आणखी एका व्यक्तीने माणुसकी जपली ती म्हणजे बेल्हे गावातील पवार मेडिकलचे मालक परशुराम पवार यांनी कुठलेही पैसे न घेता आज्जींना मदत करणाऱ्या या शूरवीरांना पीपीई किट देऊ केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ, अनेक मंत्री नाराज
गोट्याभाऊ वाघ स्वप्नील भंडारी यांनी स्वतः पीपीई किट चढवले तर त्यांचे इतर मित्र व सहकारी सुद्धा त्यांच्या बरोबर मदतीसाठी पुढे आ ले.सगळी तयारी करुन दोघांनी अग्निडाग दिला. तोच वरुणराजाने मोठे संकट समोर आणून मांडले. ओढ्याला पावसाच्या पाण्याने पुर आला. स्मशानभूमीत पाणीच पाणी झाले.
पावसानेही नवे संकट निर्माण केले. पण पुरात मृतदेह वाहून जाईल की काय अशीही भीती होतीच. पण जीवाची पर्वा न करता न डगमगता गोट्याभाऊ वाघ व स्वप्नील भंडारी यांनी हा अग्निडाग पूर्ण केला व त्या दिवसभर आपल्या आईसाठी तळमळणार्या जीवाला शांती मिळाली.
मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार- अशोक चव्हाण
यातून आपण समाजाला काहीतरी देणे लागतो याची असलेली जाणीव व यातून केलेले या कार्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलंजात आहे. या केलेल्या कार्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गोट्याभाऊ वाघ, स्वप्नील भंडारी, अण्णा गाडेकर, अशोक कवडे, किरण मंडाले, राजू गफले, शीनु गतकळ, आनंद पिंगट, दत्ता बोराडे यांचे सर्व ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आलेत. "हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा आदर्श या तरूणांनी घालून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.