मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातूनच तरुणाला अटक

आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातूनच तरुणाला अटक

पेपर फुटी प्रकरणी आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जालना, 03 डिसेंबर : आरोग्य विभागात (Maharashtra health department recruitment 2021) मोठा गाजावाजा करत परीक्षा घेण्यात आली होती. पण हॉल तिकीट आणि पेपर फुटीचा (Health Department Recruitment exam)  प्रकार समोर आला होता.  राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या ड गटाच्या पेपर फुटी प्रकरणी अखेर पुणे येथील सायबर सेलच्या (cyber police pune) पथकाने अखेर एका तरुणाला जालन्यातून (jalana) अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी पुण्यात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाअंती 29 वर्षीय विजय प्रल्हाद मुराडे या तरुणाला अटक केली आहे. हा तरुण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे.

'...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करु', अनिल परबांचा मोठा इशारा

पेपर फुटी प्रकरणी आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान अटक केलेल्या तरुणाला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे सायबर सेल या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

तुम्हीही प्रेशरकुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. पण, पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस स्टेशनमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

First published: