मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

50 लाख देतो मुख्यमंत्री योगी खूर्ची सोडणार का? हाथरस पीडितेच्या काकाचा संतप्त सवाल

50 लाख देतो मुख्यमंत्री योगी खूर्ची सोडणार का? हाथरस पीडितेच्या काकाचा संतप्त सवाल

 उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात उसळली संतापाची लाट

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात उसळली संतापाची लाट

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात उसळली संतापाची लाट

उल्हासनगर, 1 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 50 लाख देतो त्यांनी खूर्ची सोडावी, अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचे मोठ्या काकांनी दिली आहे. योग्य आदित्यनाथ सरकारवर आपला विश्वास नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते उल्हासनगर येथे राहातात. मात्र, रेल्वे तिकीट न मिळाल्यानं गावी जाता आलं नाही, अशी खंतही त्यांनी 'News18 लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. हेही वाचा...शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची 'दबंगगिरी', थेट मंदिरात केला प्रवेश योगी सरकारनं पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यावर पीडितेच्या काकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगर शहरात राहणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. आमच्या मुलींवर बलात्कार करून हत्या केली.तिला अग्नी देण्याचा अधिकार पण पोलिसांनी हिरावून घेतला. त्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय हे दुष्कर्म करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. यावेळी 'उत्तर प्रदेश पोलिस मुर्दाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. पीडितेचे काका गेल्या 35 वर्षांपासून आपल्या परिवारासह उल्हासनगरच्या वाल्मिकीनगर भागात राहतात. मात्र, रेल्वेचं तिकीट न मिळाल्यानं हाथरसला जाऊ शकलो नाही, अशी खंत पीडितेचे काका आणि चुलत भावांनी व्यक्त केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बलात्कार झाल्याचा उल्लेखच नाही! दरम्यान, दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital Delhi) उपचार सुरु असतानाच हाथरस येथील पीडितेची प्राणज्योत मालवली. पीडितेचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पॅनलद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, पीडितेचा अनेकदा गळा आवळण्यात आला होता. गळ्याचं हाड मोडल्यामुळे पीडितेचा मृत्यू झाला. अनेकदा गळा आवळल्यामुळे पीडित तरुणीच्या गळ्याचं हाड मोडलं असावं. गळ्यावर अनेक जखमाही आढळल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. धक्कादायक म्हणजे, पीडितेवर बलात्कार झाला होता, असा रिपोर्टमध्ये कुठेही उल्लेख नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, गळा आवळल्यामुळे पीडितेचे सर्वाइकल स्पाइन मोडलं होतं आणि हेच तिच्या मृत्यूचं मूळ कारण आहे. या आधी अलीगड येथील जेएन मेडिकल कॉलेजच्या रिपोर्टमध्येही गळ्याचं हाड मोडल्याचा उल्लेख आला होता. पीडितेवर बलात्कार नाही, असंही मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी तीन सदस्यीय एसआयटीची (SIT) स्थापन केली असून असून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम योगी यांनी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय संघाची स्थापना केली आहे. डीआयजी चंद्र प्रकाश आणि आयपीएस पूनम यात सदस्य असतील. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तळाशी जाऊन SITला दिलेल्या वेळेत रिपोर्ट सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्रकरणात चारही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठविण्यात आले आहे. हेही वाचा..बिहारमध्ये खळबळ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या 7 दिवसात SIT देणार रिपोर्ट एकीकडे विरोधीपक्ष योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सरकार दबावात आहे. यातच मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापना केली असून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सात दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
First published:

Tags: Nirbhaya gang rape case, Up Police, Yogi adityanath

पुढील बातम्या