जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची 'दबंगगिरी', थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ

शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची 'दबंगगिरी', थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ

शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची 'दबंगगिरी', थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ

सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय, सामान्य जनतेला वेगळा न्याय का?

  • -MIN READ
  • Last Updated :

भुसावळ, 1 ऑक्टोबर: राज्य सरकारनं (Maharashtra Government) मिशन बिगीन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत अनलॉकचा 5 वा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्या राज्य सरकारनं आणखी काही नियम शिथिल केले आहे. राज्यात हॉटेल (Hotels), बार (Bar), रेस्टॉरंट (restaurants) येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, राज्यात अद्याप ‘देऊळ बंद’च आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांची दंबगगिरी समोर आली आहे. आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कोरोनाच्या काळात थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ केल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा… फडणवीसांचा आणखी एक निर्णय राज्य सरकार फिरवणार, मंत्रालयात हालचालींना वेग बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर शासनाच्या नियमानुसार बंद आहे. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला. एवढंच नाही तर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लवकर कोरोनामूक्त होण्यासाठी आमदार पाटील यांनी पूजापाठ केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. बोडवड तालुल्यातील शिरसाळा हनुमान मंदिर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असताना सत्ताधारी पक्षाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी शिरसाळा हनुमान मंदिर उघडून राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोनाच्या विळख्यातून लवकर सुटका होऊ दे, यायासाठी पूजाअर्चा केली. हेही वाचा… काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण; पावसाळी अधिवेशनात होते सहभागी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई, शिवसेना कार्यकर्ते सोशल डिस्टन्स न पाळता उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिरसाळा हनुमान मंदिरात पूजापाठ करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सत्ताधारी पक्षाला वेगळा न्याय, सामान्य जनतेला वेगळा न्याय का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात